जिल्हा प्रतिनिधी/ सतीश पटले
तुमसर तालुक्यातील चांदपूर जलाशय शेतकऱ्यांसाठी वरदान ठरला आहे. या जलाशयातील पाणी रब्बी व खरीप हंगामात शेती सिंचनासाठी सोडले जाते.हा जलाशय ब्रिटिशकालीन असून या जलाशयातील मुख्य कालवे व उपमुख्य कालवे जीर्णवस्थेत असून कालवे फुटणे हे नित्याचेच झाले आहे. सध्या खरीप हंगामासाठी धान पिकांना सिंचनासाठी जलाशयाचे पाणी सोडण्यात आले. यातच 30 सप्टेंबरला सायं.6 वाजताच्या सुमारास चांदपूर जलाशयाचा उजवा कालवा फुटला. यात शेतकरी दुलीचंद तुरकर, बेनू लांजे यांच्या शेतात कालव्याचे पाणी शिरल्याने शेतकऱ्यांनी लागवड केलेले धानपिक भुईसपाट झाले. यामुळे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी संबंधित विभागाला नुकसान भरपाई देण्याची मागणी केली आहे.

