सालेकसा : बाजीराव तरोने
राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रमाच्या अंतर्गत, केंद्र शासनाच्या निर्देशानुसार तंबाखू आणि तंबाखूजन्य पदार्थांवर नियंत्रण आणण्यासाठी सिगारेट व इतर तंबाखूजन्य पदार्थ नियंत्रण कायदा २००३ प्रभावीपणे लागू करण्यात येत आहे. यानुसार, जिल्ह्यातील सार्वजनिक ठिकाणे, सरकारी व बिगर सरकारी शैक्षणिक संस्था, आरोग्य संस्था आणि तंबाखू विक्री केंद्रांवर नियमितपणे भेट देऊन, नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई केली जाणार आहे.
सालेकसा तालुक्यात या अंमलबजावणीसाठी तालुका स्तरीय पथकाची स्थापना करण्यात आली आहे. या पथकाचे अध्यक्ष गट विकास अधिकारी एस.जी. पुरी आहेत, तर सचिव म्हणून तालुका आरोग्य अधिकारी डॉ. स्वप्निल आत्राम यांची नियुक्ती झाली आहे. इतर सदस्यांमध्ये वैद्यकीय अधीक्षक डॉ. बी.डी. जैस्वाल, पोलीस निरीक्षक भूषण बुराडे, दंत शल्यचिकित्सक डॉ. आर.आर. त्रिपाठी, गट शिक्षण अधिकारी वी.सी. डोंगरे, तसेच पत्रकार आणि सामाजिक कार्यकर्ते बाजीराव तरोने आणि सुनील असाटी यांचा समावेश आहे.
हे पथक तालुका पातळीवर तंबाखू नियंत्रणाच्या अंमलबजावणीसाठी कार्यरत राहील, तसेच तंबाखूजन्य पदार्थांच्या वापरावर नियंत्रण ठेवण्याच्या उद्देशाने विविध उपाययोजना राबवेल.