राष्ट्रपिता महात्मा गांधी व माजी पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री यांची जयंती उत्साहात साजरी

0
344
1

आमगांव : आज दिनांक 02 ऑक्टोबर 2024 रोजी जिल्हा परिषद वरिष्ठ प्राथमिक शाळा, चिरचाळबांध येथे राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि माजी पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. या कार्यक्रमाचे अध्यक्ष मा. केवलचंद भाजीपाले (शा. व्य. स. अध्यक्ष) होते. शाळेचे मुख्याध्यापक मा. एन. बी. बिसेन सर, शाळेतील सर्व शिक्षक वृंद आणि विद्यार्थ्यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडला.

या प्रसंगी महात्मा गांधी आणि लाल बहादूर शास्त्री यांच्या जीवनकार्याचे स्मरण करून त्यांचे विचार आणि कार्य विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचविण्यात आले. विद्यार्थ्यांनी विविध सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले आणि गांधीजींच्या विचारांवर भाषणे दिली.