आमगाव: दिनांक ०१ ऑक्टोबर २०२४ रोजी श्री गणेश ग्रामीण विकास शिक्षण संस्था गोंदिया तर्फे आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर दलित मित्र पुरस्कृत बाहेकारजी व्यसनमुक्ति केंद्र रिसामा, आमगाव यांच्या संयुक्त विद्यमाने रेल्वे स्थानक परिसरात “स्वच्छता ही सेवा २०२४” उपक्रम राबविण्यात आला. राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या १५५व्या जयंतीचे औचित्य साधून हा स्वच्छता उपक्रम आयोजित करण्यात आला होता.
उपक्रमाची संकल्पना “स्वभाव स्वच्छता, संस्कार स्वच्छता” अशी ठेवण्यात आली होती. याअंतर्गत, आमगाव रेल्वे स्थानक परिसराची सफाई करण्यात आली. यामध्ये SECR रेल्वे कर्मचारी आणि स्थानकाचे अधिकारी यांचा सक्रिय सहभाग होता. उपस्थित प्रमुख रेल्वे अधिकारी राजेश जी. भीमकर (स्टेशन निरीक्षक), रंजित कुमार (स्टेशन मास्टर), पोर्णिमा हत्तिमारे (स्टेशन मास्टर) आणि रमेश गोप यांनीही स्वच्छता मोहिमेत योगदान दिले.
या उपक्रमात बाहेकरजी व्यसनमुक्ति केंद्राचे कर्मचारी संतोष बल्लारखेड़े, ज्योती कोटान्गले, मृणाल बारसे, एम. एस. रहांगडाले, मनीषा कवले, कुंदन डहाट, जितेन्द्र मेश्राम, विकास कटरे, स्वप्निल मेश्राम आणि व्यसनमुक्ति केंद्राचे लाभार्थी देखील सहभागी झाले होते.
स्वच्छतेचा संदेश देत, या उपक्रमाने स्थानक परिसरातील स्वच्छता राखण्याचे महत्त्व अधोरेखित केले.