चांदपूर येथे वन्यजीव सप्ताह मोठ्या उत्साहात साजरा..

0
221

जिल्हा प्रतिनिधी/ सतीश पटले 

भंडारा जिल्ह्याच्या तुमसर तालुक्यातील चांदपूर येथे वन्यजीव सप्ताहा निमित्ताने दि.2ऑक्टोंबरला वनविभाग तुमसर, आडकूजी चौधरी आदिवासी आश्रम शाळा, वनकर्मचारी व ग्रामवन समिती यांच्या संयुक्त विद्यमाने वन्यजीव सप्ताह मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी गावात प्रभातफेरी काढून नागरिकांना वन व वन्यजीव संरक्षण बाबत जनजागृती करण्यात आली. तसेच चांदपूर मंदिर परिसरात स्वछता मोहीम राबवून साफसफाई करण्यात आली. दरम्यान विद्यार्थ्यांना रोपवाटिकेतील रोपे, सारस पक्षी, फुलपाखरू याविषयी माहिती देण्यात आली. यावेळी वन व वन्यजीवांचे संरक्षण व संवर्धन करण्याचे संकल्प घेण्यात आले. याप्रसंगी आडकूजी चौधरी आदिवासी आश्रम शाळेतील मुख्याध्यापक टी. डी. कटरे, तुमसर वनविभागाचे वनपरिक्षेत्र अधिकारी सी. जी. रहांगडाले, क्षेत्र सहा.ए. वाय. शेख, एस. पी. डेहनकर क्षेत्र सहा. हरदोली, सारस मित्र अझहर पाशा,नीरज बनसोड, अतुल ढबाले, बीटरक्षक ए. जे. वासनिक, एच. एम. आहाके, एस. एस. सेलोकर, राठोड तसेच आडकूजी आदिवासी शाळेतील शिक्षकवृंद, विद्यार्थी व तुमसर,हरदोली व चिचोली सहवन क्षेत्रातील वनकर्मचारी प्रामुख्याने उपस्थित होते.