
संपूर्ण विदर्भातच नव्हे तर सर्व महाराष्ट्रामध्ये दरवर्षी मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात येणारा नवरात्र उत्सव सोहळा हा आलापल्ली शहरात गेल्या २० वर्षांची परंपरा लाभलेला असून, यावर्षी या फ्रेंड्स क्लब नवदुर्गा मंडळ अल्लापल्ली नवरात्र उत्सवासाठी सज्ज आहें.
नऊ दिवसीय नवदुर्गा चे रूप दर्शन घडविणारे तालुक्यातून एकमेव मंडळ आहें.
माँ वैष्णो धाम दुर्गा मंदिर अल्लापल्ली येथे पाचही तालुक्यातून भाविक श्रद्धालू येत असतात, नवसाला पावणारी दुर्गा माता दर्शन घ्यायला तेलंगाना सीमेवर असलेले श्रद्धालू मोठ्या संख्येने येतात.
फ्रेंड्स क्लब नवदुर्गा मंडळाचे हा २० वा वर्ष या वर्षी नवनवीन कार्यक्रमाचे आयोजन केले आहे.दरवर्षी दुर्गा महोत्सवात नऊ दिवसीय अन्नदानाचे कार्यक्रम आयोजन करतात या उत्सवामध्ये दांडिया, गर्भा नृत्य विशेष आकर्षण असते दांडिया,गर्भा नृत्या साठी ५ तालुक्यातून चमू भाग घेत असतात विजेता ला बक्षीस दिल्या जाते. सामाजिक उपक्रम दरवर्षी राबवितात. रांगोळी स्पर्धा गेम्स विजेतांना बक्षीस वितरण करतात.
या मंडळाचे विशेष आकर्षण दरवर्षी घेणारे लक्की ड्रॉ या लक्की ड्रॉ मध्ये भरभरून वस्तू असतात दरवर्षी पहिलं बक्षीस म्हणून बाईक असते या वर्षी सुद्धा पहिले बक्षीस म्हणून हिरो बाईक सह ११ आकर्षक भेट वस्तू आहेंत.
नऊ दिवसीय भजन,कीर्तन,जगराताचे आयोजन करत असतात या मंडळाचे नवनवीन उपक्रमात गावकरी सहभाग होत असतात दसऱ्याच्या दुसऱ्या दिवशी माँ भगवतीचा ढोल ताशाच्या गजरात भक्तिमय वातावरणात विसर्जन करतात..

