*अहेरी:-* मागील 40 वर्षापासून अहेरी तालुक्यातील बोरी येथे पारंपारिक व ऐतिहासिक रित्या गंगादेवीची मूर्ती प्राणप्रतिष्ठापना करून उपासना केली जाते. भोई समाजाच्या वतीने तब्बल 40 वर्षांपासून सदरील कार्यक्रम घेण्यात येत आहे.
तसेच यंदाही पारंपारिकरित्या भोई समाज बोरी येथे दिनांक 3 ऑक्टोबर 2024 रोजी गंगादेवीची प्राणप्रतिष्ठापना करण्यात आली आहे. यावेळी श्रीनिवास विरगोनवार, महेश बाकीवार, रामा बद्दीवार, अशोक वासेकर, साईनाथ अलवलवार, पोच्या बाकीवार, भिमराव कपेलावार, गंगा कपेलावार, शंकर सुर्लावार, संजय येल्लावार, सुरेश बाकीवार, मल्ला मंचर्लावार, गव्वा कपेलावार, विनोद मंचर्लावार, सुरेश मंचर्लावार, व्यंकटेश बलसपेल्लीवार, सिनू कपेलावार, गंगा कपेलावार यांच्यासह आदी व अन्य नागरिकांची उपस्थिती होती.
विशेष म्हणजे जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा तथा गोंडवाना विद्यापीठ सिनेट सदस्या भाग्यश्री आत्राम यांच्या उपस्थितीमध्ये गंगा मातेचा प्राणप्रतिष्ठा सोहळ