गोंदिया : दि.०४ ऑक्टोबर उद्या खादी ग्रामोद्योग, गजानन मंदिर समोर, गोविंदपुर रोडवरील सभागृहात ओबीसी संवाद सभेचे आयोजन करण्यात आले आहे. या सभेचे नेतृत्व ओबीसी संघर्ष कृती समिती गोंदिया जिल्हाध्यक्ष बबलू कटरे यांच्या अध्यक्षतेखाली होणार आहे.
सभेत राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे महासचिव सचिन राजुरकर, विद्यार्थी महासंघाचे प्रवक्ता ऋषम राऊत, आणि ओबीसी योद्धा रविंद्र टोंगे मार्गदर्शन करतील. चर्चा ओबीसी वस्तीगृहांची स्थिती, आजचे वास्तव, व ओबीसी चळवळीच्या सद्यस्थितीवर होईल, तसेच प्रश्न-उत्तर सत्र आयोजित केले जाईल.
या कार्यक्रमासाठी संध्याकाळी ०५ वाजता उपस्थित राहण्याचे आवाहन ओबीसी संघर्ष कृती समिती, ओबीसी सेवासंघ, ओबीसी महासंघ, ओबीसी अधिकार मंच, बहुजन विचार मंच, म. फुले समता परिषद, व संवैधानिक मार्गावर विश्वास ठेवणाऱ्या सर्व कार्यकर्त्यांनी केले आहे.
यावेळी सरपंच चंद्रकुमार बहेकार भजेपार आणि उपजिल्हाधिकारी प्रणया सोमकांत भालेकर यांचा सत्कार करण्यात येणार आहे.

