मुख्यमंत्री बळीराजा मोफत वीज योजना: शिवसेनेचा शेतकऱ्यांना विजबिल वितरण उपक्रम

0
133
1

सालेकसा / मायकल मेश्राम

सालेकसा तालुका,  नक्षलप्रभावित, आदिवासीबहुल आणि अविकसित भागांपैकी एक आहे, तेथे मुख्यमंत्री बळीराजा मोफत वीज योजनेमुळे शेतकऱ्यांमध्ये आनंदाची लाट पसरली आहे. महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील महायुती सरकारने 7.5 एचपीपर्यंतच्या शेती पंपांसाठी मोफत वीजपुरवठा करण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला आहे. विशेष म्हणजे, नवरात्रीच्या शुभ मुहूर्तावर शेतकऱ्यांना संपूर्ण विजबिल शून्य रुपये करून पाठवले गेले, ज्यामुळे ग्रामीण भागातील शेतकऱ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे.

या योजनेअंतर्गत, सालेकसा तालुक्यातील शिवसेना पदाधिकाऱ्यांनी रोंढा गावातील शेतकऱ्यांना सूट मिळालेल्या विजबिलांचे वितरण केले. या कार्यक्रमात शिवसेना जिल्हा समन्वयक डॉ. साठवने, तालुका प्रमुख विजय नागपुरे, तालुका युवासेना प्रमुख मायकल मेश्राम, शहर युवासेना प्रमुख बाजीराव तरोने, रवि थेर, घनश्याम नागपुरे, श्रीकिशन नेवारे, हेमराज नागपुरे, जयराम लिल्हारे आणि भुवन नागपुरे यांसह शिवसैनिक उपस्थित होते.

शिवसेनेच्या या उपक्रमामुळे शेतकऱ्यांमध्ये समाधानाची भावना निर्माण झाली असून, त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि शिवसेनेचे मनःपूर्वक आभार मानले आहेत.