निकेश ठाकरेला सत्र न्यायालयाकडून मिळाला अटकपूर्व जामीन

0
223

नागपूर : नागपूर येथील पारडी पोलिस ठाण्याच्या हद्दीत २८ ऑगस्ट २०२४ रोजी श्याम नगर येथे दोन गटांमध्ये मारामारी झाली. या प्रकरणात निकेश ठाकरे यांचा सहभाग असल्याचे तक्रारकर्त्याने पोलिसांना सांगितले. त्यानुसार, पारडी पोलिसांनी अपराध क्रमांक ०४२४ दाखल केला आणि शस्त्र अधिनियमांतर्गत कलम २५, ४, व १३५ तसेच भारतीय न्याय संहितेच्या कलम १०९, ११५ (२), ११८, २९६, ३(५), ३५१(३), आणि ३५२ अंतर्गत गुन्हा दाखल केला.

निकेश ठाकरे यांनी या गुन्ह्यात नाहक गोवण्यात आल्याचा दावा करत नागपूर सत्र न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज दाखल केला. त्यांच्या वतीने अधिवक्ता आदिती योगेश पारधी यांनी न्यायालयात युक्तिवाद सादर केला. माननीय सत्र न्यायालयाने निकेश ठाकरे यांना अटकपूर्व जामीन मंजूर केला, त्यामुळे त्यांना दिलासा मिळाला आहे.