जन सन्मान यात्रेच्या पूर्वतयारीसाठी नवेगावबांध येथे बैठकीचे आयोजन

0
117
1

गोंदिया : आज नवेगावबांध येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत अर्जुनी मोरगाव विधानसभा क्षेत्रातील पक्ष पदाधिकारी व कार्यकर्त्यांची जन सन्मान यात्रेच्या पूर्वतयारीसाठी बैठक आयोजित करण्यात आली. या बैठकीत माजी आमदार  राजेंद्र जैन व आमदार  मनोहर चंद्रिकापुरे प्रमुख उपस्थित होते.

माजी आमदार राजेंद्र जैन यांनी आगामी जन सन्मान यात्रेच्या तयारीसाठी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले. त्यांनी सांगितले की, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, खासदार प्रफुल पटेल, आणि प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे यांच्या नेतृत्वात होणाऱ्या या यात्रेमध्ये राज्यातील महिलांना आत्मनिर्भर व स्वावलंबी बनविण्याकरिता लाडली बहीन योजना, शेतकऱ्यांना बोनस, कृषी पंपांसाठी मोफत वीज, व्यवसायिक शिक्षणासाठी मुलींना निःशुल्क प्रवेश, आणि युवा कार्य प्रशिक्षण यासारख्या योजनांचा प्रचार करण्यात येणार आहे. या योजनांच्या माध्यमातून नागरिकांशी संवाद साधण्यात येणार असून, या यात्रेच्या भव्य स्वागतासाठी मोठ्या प्रमाणावर तयारी सुरू आहे.

आमदार मनोहर चंद्रिकापुरे यांनी उपस्थित कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना सांगितले की, या क्षेत्रातील सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने यात्रेत सहभागी होण्यासाठी जोरदार प्रचार करावा. जन सन्मान यात्रेच्या यशस्वी आयोजनासाठी सर्वांनी मिळून काम करण्याचे आवाहन त्यांनी केले.

यावेळी प्रमुख उपस्थित मान्यवर व कार्यकर्त्यांमध्ये सर्वश्री राजेंद्र जैन, मनोहर चंद्रिकापुरे, लोकपाल गहाणे, यशवंत गणवीर, अविनाश काशिवार, दानेश साखरे, डी.यू. रहांगडाले, सुगत चंद्रिकापुरे, नामदेव डोंगरवार, सुधाताई रहांगडाले, तेजराम मडावी, मनीषा बारसागडे, शशिकला टेंभूर्णे, दीक्षाताई भगत, शिवाजी गहाणे, भोजराम राहिले, राकेश लंजे, भय्यालाल पुसतोडे, आम्रपाली डोंगरवार, रेखाताई दृगकर, आनंद अग्रवाल, रतिराम राणे, बाबा बहेकार, किशोर ब्राह्मणकर, शुभम उजवणे, सुनील डोंगरवार, देवराम डोंगरवार, आशिष लंजे, संदीप खरोले, योगराज भोयर, नरेश कोहळे, लोकराम उईके, भीमराव वाघमारे, नानाजी पिंपळकर, रमेश इडपाते, चंद्रकुमार बहेकार, निखिल भोंडे, पुंडलिक कोसरे, विकास बरैया, महेश आगासे, निखिल बरेया, मुन्ना आगासे, चंद्रकुमार शेंडे, हेमराज परतेती, खेमराज सूर्यवंशी, रवी जांभुळकर, हरिश्चंद्र किरसान, किशोर जुगनाके, ओमप्रकाश लंजे, सुरेश कापगते, सुभाष कापगते, उमराव मांढरे, भय्यालाल पूसतोडे, शामराव वासनिक, मुन्ना बोरकर, अविनाश गोडाणे, हेमराज कोसलकर, कोयल मस्के, गणराज कावडे, प्रेमलाल नागपुरे, हरगोविंद मोहूर्ले, नितेश गुरनुले, एस एस घुगुसकर, अशोक डोये, मुनीशर कापगते, डॉक्टर डोंगरे, खुशाल बांगडकर, निळाजी डहाळे, अशोक सहारे, नाशिक सहारे, संदीप हातझाडे, युवराज कापगते, आस्तिक परशुरामकर, अजय सहारे, भोलानाथ कापगते, देवीदयाल सांगोलकर, शिवपाल सहारे, यशवंत सहारे, अभिजीत नाकाडे, व्यंकट येडे, गजानन कोवे, महेंद्र परचापी, योगेश नाकाडे, शालिकराम हातझाडे, श्रावण मेंढे, सोमेश रहांगडाले, दीनदयाळ डोंगरवार, संजय इश्र्वरकर, कांतीलाल डोंगरवार, रवींद्र नाईक, भास्कर गतवार, परमानंद कोवे, प्रेमलाल भोंगाळे, करणदास रक्षा, सुनील परतेकी, ताराचंद गोगारे, आस्तिक बनसोड, मंगेश मेश्राम, युवराज बावनकुळे, शालिकराम नाकाडे, यादोराव आगासे, सनक उजवणे, नीलकंठ हुकरे, विजय फुंडे, सुरज बहेकर, कुवरलाल पटले, दिनेश बहेकार, नामदेव खोटे, मोहनलाल खोटेले, भूमेश्वर कोल्हे, मेघनाथ पटले, हेतराम पटले, घनश्याम चौधरी, गणेश भिमटे, रमेश खानवाळे, शालिकराम मसराम, तेकेश्वर परशुरामकर, दीपक कोरे, नेमीचंद वासनिक, गुरुदेव पटले, कोमल मस्के, भोजराज मेश्राम, योगीराज राजगिरे, गोवर्धन खोब्रागडे, वीरेंद्र बारसागडे, कल्पना बहेकार, रजनी गिरेपुंजे, सुशीला हलमारे, पुष्पमाला बडोले, शुभांगी वाढवे, कृष्णा कोरे, करुना गेडाम, सुनिता जयस्वाल, अनिषा पठाण, प्रतिमा परिहार, कविता पवार, हर्षा राऊत, माधुरी पिंपळकर, प्रभा हातझाडे, पुष्पा डोंगरवार, ममता बागडे, पुष्पा डोंगरवार, माधुरी बनपुरकर, यशोदा शेंडे, हर्षीला राऊत, निर्मला नेताम, कविता सराटे, दुर्गा राऊत, अनिता रहिले, भाविका डोंगरवार, दीक्षा डोंगरवार, रश्मी पवार, अनिता मरसकोल्हे, सुनिता हूकरे, पल्लवी भुमके, शितल लंजे, सुनंदा लंजे, भुनेश्वरी नाकाडे, अर्चना बोरकर, रमेश बडोले, राकेश जैन, अनिल बिलिया, रौनक ठाकुर, रूपविलास कुरसंगे, रवी घासले, प्रकाश राऊत आणि इतर अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.

यावेळी उपस्थित सर्वांनी यात्रेच्या यशस्वी आयोजनासाठी ठोस तयारी आणि प्रभावी प्रचार करण्याचा संकल्प केला.