प्रतिनिधि/पंकज रहांगडाले
भंडारा : काँग्रेस कमिटी रोजगार व स्वंयरोजगार भंडारा जिल्हाध्यक्ष पवन मस्के यांनी गोसेखुर्द प्रकल्प संघर्ष समितीच्या वतीने सुरू असलेल्या उपोषण मंडपाला आमरण उपोषणाला भंडारा शहरातील त्रिमूर्ती चौकात जिल्हाधिकारी कार्यालय समोर भेट देऊन तेथील प्रकल्पग्रस्तांच्या समस्या जाणून घेतल्या व आपला पाठिंबा जाहीर केला. प्रकल्पग्रस्तांच्या समस्या मागील २५ वर्षांपासून त्या समस्याकडे शासन मुद्दाम दुर्लक्ष करीत आहेत. या प्रकल्पग्रस्तात बऱ्याच लोकांच्या जमिनी गेल्या, घर गेले ,त्यांना शासनाने अल्प मोबदला देऊन त्यांना मोकळे केले. आज शासनाने त्यांना नोकरी सुद्धा दिलेले नाही. जे शेतकरी भूमिहीन झालेले आहेत त्यांना जमीन सुद्धा देण्यात आलेली नाही . वाढीव कुटुंबाचा 2.90 लाख मोबदला सुद्धा देण्यात आलेला नाही. जे प्रकल्पग्रस्त शासकीय नोकरी लागले होते त्यांना सुद्धा नोकरी काढण्यात आले. असा विविध मागण्यांना घेऊन गोसेखुर्द प्रकल्पग्रस्त संघर्ष समितीच्या वतीने आमरण उपोषणाला सुरुवात करण्यात आली आहे. 2.90 लक्ष रुपयाचा लाभ घेतलेल्या प्रकल्प बाधितांचे नोकरी विषयी प्रमाणपत्र पडताळणी करून देण्यात यावे ,वाढीव कुटुंब 2. 90 लक्ष रुपये वाढीव कुटुंबातील पात्र व्यक्तीला तसेच बाधित प्रकल्पग्रस्त देण्यात यांना यावे ,तिसऱ्या टप्प्यातील उर्वरित गावांचे पुरांमुळे भरपूर नुकसान होत असल्याने तात्काळ पुनर्वसन करण्यात यावे. 75 टक्के शेतजमीन गेलेली आहे अशा गावांचे शासन निर्णयानुसार पुनर्वसन करण्यात यावे ,प्रकल्प बाधित बेरोजगारांना नोकरी उपलब्ध करून देण्यात यावे अशी मागणी काँग्रेस कमिटी रोजगार व स्वंयरोजगार भंडारा जिल्हाध्यक्ष पवन मस्के यांनी केली आहे. आमरण उपोषणाला गोसेखुर्द प्रकल्पग्रस्त संघर्ष समितीचे अध्यक्ष भाऊ कातोरे, माजी सरपंच खमारी दिलीप मडामे, तंटामुक्त अध्यक्ष टाकळी सुनील भोपे हे आमरण उपोषणाला बसले आहेत. शासनाने प्रशासनाने दखल घेऊन आमरण उपोषण सोडवावे व गोसेखुर्द प्रकल्पग्रस्तांना न्याय देण्यात यावा अशी मागणी सुद्धा जनसेवक पवन मस्के यांनी केली आहे.

