जिल्हाधिकारी कार्यालयासमोर गोसेखुर्द प्रकल्पग्रस्तांचा आमरण उपोषण सुरू असून २ उपोषणकर्त्यांची प्रकृती खालावली

0
94
Oplus_131072


प्रतिनिधी/पंकज रहांगडाले

गोसेखुर्द प्रकल्पग्रस्त संघर्ष समितीच्या वतीने गोसेखुर्द प्रकल्प बाधित गावातील नागरिकांच्या विविध समस्या व मागण्यांच्या पूर्ततेसाठी दि. २ ऑक्टोंबर पासून भंडारा शहरातील त्रिमूर्ती चौकात जिल्हाधिकारी कार्यालय समोर आमरण उपोषणाला सुरुवात करण्यात आली आहे. आज दिनांक ४ ऑक्टोबर शुक्रवारला उपोषणाचा तिसरा दिवस असून तिसऱ्या दिवशी दुपारी १ वाजता दरम्यान २ उपोषणकर्त्यांची प्रकृती खालावली आहे. माजी सरपंच खमारी दिलीप मडामे व टाकळी पुनर्वसन सुनील भोपे असे प्रकृती खालावल्या उपोषणकर्त्यांची नावे आहेत. तरी शासन प्रशासनाने अद्यापही उपोषणाची दखल घेतलेली नसून शासन प्रशासनाने तात्काळ उपोषणाची दखल घ्यावी व प्रकल्पग्रस्तांच्या समस्या सोडवाव्या अशी मागणी गोसेखुर्द प्रकल्पग्रस्त संघर्ष समितीचे अध्यक्ष भाऊ कातोरे यांनी केली आहे.