- प्रतिनिधी/पंकज रहांगडाले
भंडारा : गोसेखुर्द प्रकल्पग्रस्त संघर्ष समितीच्या वतीने प्रकल्पग्रस्त उपोषण या शिष्टमंडळातर्फे भंडाराचे जिल्हाधिकारी संजय कोलते यांच्यामार्फत आज 5 ऑक्टोबर शनिवारला राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नावाने निवेदन सादर करण्यात आले. त्वरित आपल्या माध्यमातून बैठक लावण्यात यावी. अशी मागणी निवेदनातून करण्यात आली. जिल्हाधिकाऱ्यांनी शिष्टमंडळाचे म्हणणे सौम्यपणे ऐकून घेतले. शिस्टमंडळाच्या प्रमुख मागण्यांमध्ये प्रकल्प बाधित प्रकल्पग्रस्त मुला मुलींचे दाखले ग्राह्य देण्यासाठी विशेष म्हणजे ज्या गावांचे पुनर्वसनातील जमीन गेल्या त्यांना किमान एक एकर शेतजमीन व त्यांना रोजगार उपलब्ध करून देणे. आणि प्रकल्पातील उर्वरित 23 गावांच्या ऐच्छिक पुनर्वसन बाधित क्षेत्राच्या जमिनीचे लवकरात लवकर थेट खरेदी बद्दल अशा अनेक प्रकल्पग्रस्त थेट मागण्याबद्दल शिष्टमंडळाने संवाद साधला एकंदरीत दीड तास ही बैठक विशेष रूपाने झाली. त्या बैठकीमध्ये जिल्हाधिकारी डॉ. संजय कोलते, निवासी उपजिल्हाधिकारी पठाण व शिष्टमंडळामध्ये गोसेखुर्द प्रकल्पग्रस्त संघर्ष समितीचे सचिव शेषराज रामटेके, भंडारा जिल्हा काँग्रेस कमिटी रोजगार व स्वयंरोजगार विभागाचे जिल्हाध्यक्ष पवन मस्के, प्रमिला शहारे, अतुल राघोर्ते, श्रीराम बाते, आदी अनेक प्रकल्पबाधित गावांचे नागरिक फार मोठ्या संख्येने उपस्थित होते.

