नवरात्रीच्या पूर्वसंध्येला नमस्ते नाशिक फाउंडेशनकडून आदिवासी विद्यार्थ्यांना शालेय साहित्य आणि अन्नदान

0
103

संस्थेची मदतीची धडपड दुर्गम भागांमध्ये पोहोचली…

नाशिक :  नमस्ते नाशिक फाउंडेशनने नवरात्रीच्या पूर्वसंध्येला ठाणगाव (सिन्नर तालुका) येथील दुर्गम आदिवासी भागातील विद्यार्थ्यांना शालेय उपयोगी वस्तू आणि अन्नदानाचे वाटप केले. आर्थिक दुर्बलतेमुळे दैनंदिन आवश्यक वस्तूंना वंचित असलेल्या या विद्यार्थ्यांना आवश्यक साहित्याची मदत मिळाली.

 नमस्ते नाशिक फाउंडेशनने “जिथे कमी तिथे आम्ही” या तत्त्वावर चालत, नवरात्रीच्या पूर्वसंध्येला दुर्गम आदिवासी भागातील विद्यार्थ्यांना शालेय साहित्य व अन्नदानाचे वाटप केले. आर्थिक परिस्थिती नसल्यामुळे अनेक विद्यार्थी दैनंदिन गरजेच्या वस्तूंनाही वंचित राहतात. या विद्यार्थ्यांना मदत मिळावी या उद्देशाने, संस्थेच्या अध्यक्षा स्नेहल देव यांच्या संकल्पनेतून शालेय उपयोगी साहित्य जसे की वही, खोडरबर, पेन्सिल, पाट्या, टॉवेल, मुलींसाठी सॅनिटरी पॅड, शाळेत हवा खेळती राहण्यासाठी पंखे आणि शुद्ध पाण्यासाठी वॉटर फिल्टर यांचे वाटप करण्यात आले.

याशिवाय शाळेच्या पटांगणात सावली मिळावी याकरिता व्यावसायिक छत्र्यांचे वाटप करण्यात आले. सर्व विद्यार्थ्यांना मिठाई व शरीरास पोषक असे ड्रायफ्रूट्स यांचेही वितरण करण्यात आले. या उपक्रमांतर्गत शाळेतील ज्या विद्यार्थ्यांनी शैक्षणिक क्षेत्रात उत्तुंग यश मिळवले आहे त्यांचा पेन सेट देऊन सत्कार करण्यात आला.

कार्यक्रम ठाणगाव (तालुका सिन्नर) येथील विविध शाळांमध्ये आयोजित करण्यात आला होता. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी स्नेहल देव, अपर्णा बापटे, अश्विनी पाटील आणि संदीप देव उपस्थित होते. प्रसिद्ध उद्योजक हरीश गुरुनानी यांच्या मार्गदर्शनाखाली महावीर इंटरनॅशनलचे अनिल नहार आणि कर्नल मच्छिंद्र शिरसाट यांचे मोलाचे सहकार्य लाभले.

कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शाळेच्या वतीने सहाय्यक शिक्षक संजय भांगे, बापू गोविंद, श्रीमती सुवर्णा शिरसाट, श्रीमती ज्योती शिरसाट आणि मुख्याध्यापक राजाराम आहेर यांनी उपक्रमाच्या आयोजनात योगदान दिले. त्यांनी सर्व उपस्थितांचे आभार मानले.

नवरात्रीच्या पूर्वसंध्येला झालेल्या या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांना त्यांच्या शालेय जीवनात मदत मिळाली आहे, आणि या कृतीमुळे सामाजिक योगदानाचे महत्त्व अधोरेखित झाले आहे.