ग्रा.पं. सदस्यांचे मानधन वाढवा; साकोली तालुका ग्रा.पंच संघटनाच्या वतीने अप्पर जिल्हाधिकारी व मुख्य कार्यकारी अधिकारी यांचे मार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन

0
258

जिल्हा प्रतिनिधी/सतीश पटले

काही दिवसांपूर्वी सरपंच संघटनेच्या वतीने राज्यसरकार विरोधात ग्रामपंचायत स्तरावरील विकासात्मक कामाबाबत व सरपंच, उपसरपंच, सदस्य यांच्या मानधनात वाढ करावी. यासाठी ग्रामपंचायतीला ताला ठोकून काम बंद आंदोलन पुकारले होते. त्यामध्ये ग्रामपंचायत सदस्य यांनी सुद्धा सहकार्य करीत आंदोलनात सहभागी झाले या आंदोलनाची दखल घेत राज्यसरकारने सरपंच, उपसरपंच यांचे मानधनात वाढ केली परंतु ग्रामपंचायत सदस्य यांचा विचार केला नाही. ग्रामपंचायत विकासात सरपंच, उपसरपंच यांचा वाटा मोठा असला तरी ग्रामपंचायत सदस्य यांच्या सही शिवाय कोरम पूर्ण होत नाही व कोणतेही काम सरपंच करू शकत नाही व हि सत्यता नाकारता येत नाही. असे असल्यावरही राज्य शासनाने ग्रामपंचायत सदस्य यांचे मानधन वाढविले नाही हे कितपत योग्य आहे .यासाठी ग्रामपंचायत सदस्यांचे मानधन 2000 रुपये ,ग्रामपंचायत सदस्य यांना वॉर्ड निहाय निधी देण्यात यावी. यासाठी साकोली तालुका ग्रामपंचायत सदस्य संघटनेच्या वतीने ग्रामपंचायत सदस्य भावेश कोटांगले यांच्या नेतृत्वात भंडारा अपर जिल्हाधिकारी व मुख्य कार्यकारी अधिकारी यांचे मार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन देण्यात आले.यावेळी ग्रा.पं.सदस्य राजेश शहारे, राहुल टेंभुर्ण, सुभाष नेवारे,युवराज वखारे, संजय बहेकार,नरेंद्र भांडारकर,दिगंम्बर झोळे, सविता साठे, ज्योती बडवाईक, फागेश्वर खुशराम, संदीप भांडारकर,राजेश बडोले,तुषार पटले, जयश्री बडवाईक,प्रभाबाई टेंभुरकर,दिनेश आदे इत्यादी सदस्य उपस्थित होते.