सालेकसा/मायकल मेश्राम
जि.प. शाळा कडोतीटोला येथे पालक सभेचे आयोजन करण्यात आले होते, त्या निमित्ताने पत्रकारिता आणि सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणारे पत्रकार किशोर वालदे यांचा सन्मान करण्यात आला. जि.प. शाळा आणि शाळा व्यवस्थापन समितीच्या वतीने वालदे यांना शाल आणि श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमास प्रमुख उपस्थिती म्हणून सरपंच आम्रपाली कोटांगले, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष राहुल शहारे, मुख्याध्यापक अजय उके, शैलेश शहारे, विजेंद्र कोटांगले, पवन शहारे उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अनिल पडळकर यांनी केले तर आभार प्रदर्शन विशाल पानढवळे यांनी केले. यावेळी स्वयंसेवक प्रगती साखरे यांची देखील विशेष उपस्थिती होती.
सत्कार समारंभादरम्यान, पत्रकार किशोर वालदे यांच्या कार्याचे कौतुक करण्यात आले आणि समाजाच्या हितासाठी त्यांनी केलेल्या योगदानाबद्दल विशेष गौरव करण्यात आला.