गोंदिया : कवलेवाडा जिल्हा परिषद क्षेत्र अंतर्गत ग्राम मुंडीकोटा येथील सत्यसाईबाबा सभागृहामध्ये आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्ता बैठकीचे आयोजन करण्यात आले. ही बैठक माजी आमदार श्री. राजेंद्र जैन यांच्या अध्यक्षतेत आणि जिल्हाध्यक्ष प्रेमकुमार रहांगडाले यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडली. आगामी विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने ही बैठक महत्त्वाची ठरली असून पक्षाच्या विविध घटकांना गावपातळीवरील कार्यकर्त्यांशी थेट संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले.
बैठकीत माजी आमदार श्री. राजेंद्र जैन यांनी आगामी निवडणुका लक्षात घेऊन गावागावांमध्ये बूथ कमेट्या तयार करण्याचे निर्देश दिले. तसेच खा. प्रफुल पटेल यांच्या माध्यमातून क्षेत्रात झालेल्या विकास कामांचा आढावा घेतला आणि शेतकऱ्यांना बोनस, कृषी विधेयक माफी, सिंचन योजना, लाडली बहीण योजना, अदानी प्रकल्प यासारख्या मुद्द्यांवर जनतेपर्यंत पोहोचण्याचे आवाहन केले. त्यांनी महायुतीतील उमेदवारांच्या पाठिंब्यासाठी कार्यकर्त्यांना एकत्र येण्याचेही आवाहन केले.
बैठकीला श्री. राजेंद्र जैन, प्रेमकुमार रहांगडाले, राजलक्ष्मी तुरकर, योगेंद्र भगत, देवचंद ठाकरे, कैलास पटले, मनोज डोंगरे, किरण पारधी, जगदीश बावनथडे, पिंटू चौधरी, अतुल भांडारकर, जयाताई धावडे, निताताई रहांगडाले, रामसागर धावडे, संभाजी ठाकरे, मनोहर राऊत, संदीप मेश्राम, किशोर पारधी, रंजित मेश्राम, नंदकिशोर शरणागत, किरण बन्सोड, बबन कुकडे, अल्केश मिश्रा, गणेश रहांगडाले, किरण वैद्य, प्रभाताई राऊत, राजेश तायवाडे, दहीकरजी, यासिन छवारे, अजय नंदागवळी, रिता पटले, किशोर पारधी, राजेश पसेने, बंडू रहांगडाले, दिलीप भैरम, अजब भोयर, बापू कनासकर, अमुल राहूल, मायाबाई पटले, रतिराम पारधी, रामदास पारधी, देवनबाई पारधी, रौनक ठाकुर आणि इतर अनेक कार्यकर्ते आणि पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
ही बैठक आगामी निवडणुकांच्या तयारीसाठी पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये नवीन उर्जेचा संचार करणारी ठरली.