तिरोडा : पोमेश राहंगडाले
महायुती सरकारने महिलांच्या सक्षमीकरणासाठी सुरू केलेल्या मुख्यमंत्री लाडकी बहिण योजनेला महाराष्ट्रात उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. या योजनेअंतर्गत महिलांना दरमहा १५०० रुपये आर्थिक सहाय्य दिले जात असून, ऑक्टोबर महिन्यापर्यंत ७५०० रुपये लाभार्थ्यांच्या खात्यात जमा करण्यात आले आहेत. या योजनेचा लाभ मिळालेल्या महिलांचा मेळावा तिरोडा गोरेगाव विधानसभा क्षेत्राचे आमदार विजय रहांगडाले यांच्या पुढाकाराने आयोजित करण्यात आला. या मेळाव्यांना महिलांचा प्रचंड प्रतिसाद लाभला असून, विविध गावांमध्ये आयोजन केलेल्या मेळाव्यांनी महिलांच्या सक्षमीकरणासाठी मोठा उत्साह दिसून आला आहे.
या मेळाव्यांचे आयोजन ठाणेगाव, वडेगाव, सेजगाव, बेरडीपार, सुकडी, बेलाटी, बयवाडा आणि परसवाडा येथे करण्यात आले. मेळाव्याच्या प्रमुख उपस्थितांमध्ये आमदार विजय रहांगडाले, महिला जिल्हाध्यक्ष तुमेश्वरी बघेले, महिला मोर्चा जिल्हा महामंत्री सीताबाई रहांगडाले, जिल्हा परिषद सदस्या रजनी कुंभरे, एड. माधुरी रहांगडाले, चत्रभूज बिसेन, पंचायत समिती सभापती कुन्ता पटले, भाजप तालुकाध्यक्ष भाऊराव कठाणे, विधानसभा संयोजक पवन पटले, विधानसभा प्रमुख विजय राणे, महिला आघाडी तालुकाध्यक्ष स्वाती चौधरी, पंचायत समिती सदस्या कविता सोनेवाने, प्रमिला भलाई, दिपाली टेंभेकर, सुनंदा पटले, ज्योती शरणागत, पंचायत समिती उपसभापती हुपराज जमाईवार, डॉ. चेतलाल भगत, तेजराम चव्हाण, डॉ. ब्रिजलाल रहांगडाले, माजी उपसभापती डॉ. वसंत भगत, जिल्हा महामंत्री मदन पटले, युवा मोर्चा तालुकाध्यक्ष रवींद्र वहिले, भाजप महामंत्री रवी मुटकुरे, ओबीसी महामंत्री गौरी पारधी, सोशल मिडिया प्रमुख संजय पारधी, तसेच संबंधित गावातील ग्रामपंचायत सरपंच आणि महिला भगिनी उपस्थित होते.
या मेळाव्यांच्या माध्यमातून महिलांना सक्षम बनविण्याच्या दिशेने मोठे पाऊल उचलले गेले असून, लाडकी बहिण योजनेच्या माध्यमातून महिलांना आर्थिक सक्षमीकरणाचे महत्त्व पटवून देण्यात आले आहे.