गोंदिया /प्रतिनिधी
अवघ्या काही दिवसात महाराष्ट्र विधानसभा चे बिगुल वाजणार आहे. महाराष्ट्रात महायुती आणि महाआघाडी आपापले उमेदवार ठरवण्यात दंग झाले आहेत. विविध माध्यमातून प्रत्येक पक्ष आपल्या विधानसभेत कोणता उमेदवार तुल्यबळ ठरू शकेल याची चाचपणी करत आहे. या विधानसभा निवडणुकीत भाजपा पक्ष अनेक विद्यमान आमदारांना डच्चू देईल असे संकेत मिळत आहेत. गुजरात विधानसभेत सुद्धा भाजपने अशीच रणनीती अवलंबवली होती. यावर्षीच्या विधानसभेच्या निवडणुकीत भाजपकडून गुजरात पॅटर्न उमेदवारीच्या बाबतीत भाजप अवलंबेल अशी माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. गोंदिया जिल्ह्यातील तिरोडा विधानसभेत सुद्धा विद्यमान आमदारांच्या कामगिरीवर लोकांची नाराजी पाहता यावेळी विधानसभेचा उमेदवार भाजपकडून बदलला जाईल अशी चर्चा रंगू लागली आहे. या विधानसभा क्षेत्रात महाविकास आघाडी चे उमेदवार फुल फॉर्म मध्ये आहेत. शिवाय त्यांना मिळणारा उदंड प्रतिसाद पाहता भाजपच्या कोट्यात धडकी भरली आहे अशी ही चर्चा आहे. त्यामुळे महाविकास आघाडीच्या उमेदवाराला तोडीचा व टक्कर देणारा नवीन चेहरा कोण याची चाचपनी पक्षात सुरु आहे आणि त्यात माजी आमदार हेमंत पटले, जिल्हा परिषद अध्यक्ष पंकज रहांगडाले, संघांचे स्वयंसेवक प्राचार्य डॉ.धर्मेंद्र तुरकर भाजपा युवा मोर्चा जिल्हा अध्यक्ष ओम कटरे यांपैकी एकाला उमेदवारी दिली तर निवडणुकीत रंगत वाढेल अशी चर्चा आहे.परंतु सर्वांचा काहींना काही तरी वीक पॉईंट मतदार संघात दिसून येतो. त्यामुळे भाजपा ला जर नवीन उमेदवार द्यायचे झाल्यास नाकी नऊ येणार आहे. हेमंत पटले, पंकज रहांगडाले, आणि ओम कटरे ही मंडळी सक्रिय राजकारणात असल्याने यांच्या बाबत काही ना काही नकारात्मक बाबी दिसून येतात. त्यापैकी धर्मेंद्र तुरकर हा क्लीन इमेज, नॉन पोलिटिकल इमेज असणारे आणि उच्च विद्याविभुषित चेहरा असल्याने तेच भाजपा ला तारू सकतात अशी चर्चा मतदारांमध्ये आहे. तिरोडा विधानसभा क्षेत्रात धर्मेंद्र तुरकर यांनीही आपला जनसंपर्क वाढवला असून मागील दहा वर्षापासून ते भाजपकडे तिकीट मागत आहेत. विधानसभा च्या विकासासाठी आपले व्हिजन त्यांनी एका वृत्तवाहिनीला मुलाखत देताना सांगितले आहे. भाजप तसा शिस्तप्रिय पक्ष आहे. त्यामुळे विद्यमान आमदाराच्या विरोधात कितीही आक्रोश असला तरी तो आक्रोस जनतेपुढे कोणीही मांडत नाही. परंतु यावेळी भाजपच्या अनेक पदाधिकाऱ्यांनी सुद्धा धर्मेंद्र तुरकर यांच्या नावाला पसंती दिल्याची चर्चा आता विधानसभेत गावोगावी रंगू लागले आहेत. त्यामुळे या विधानसभेत भाजप आपला चेहरा तिरोडा विधानसभा क्षेत्रात बदलेल की काय? याची मतदारांमध्ये उत्सुकता वाढली आहे.