माजी जिल्हा परिषद अध्यक्षा भाग्यश्रीताई आत्राम (हलगेकर) वाढदिवसानिमित्त चिमुकल्यां मूकबधिर मुलांना भोजनदान करून वाढदिवस साजरा केला…

0
150

अहेरी – ०६/१०/२०२४

अहेरी येथील एकलव्य निवासी मूकबधिर विद्यालय येथे माजी जिल्हा परिषद अध्यक्षा भाग्यश्री ताई आत्राम( हलगेकर) चिमुकल्याना भोजनदान दिले.भाग्यश्री आत्राम (हलगेकर )आपल्या समाजकार्यातून अनेक लोकांना मदतीचा हात दिला या परिसरातील सामाजिक ख्याती आहे आज त्यांच्य वाढदिवसानिमित्त भोजनदान करून केक कापून मुलांसोबत वाढदिवस साजरा केला.या वेळेस मुख्याध्यापक संजय चौधरी यांच्या शी म्हणाले आपल्याला कोणतेही मदत लागल्यास सांगा निश्चितपणे मी मदत करीन असे बोलले.

या प्रसंगी विभागीय महिला अध्यक्षा शाहीन हकीम, सामाजिक कार्यकर्ता श्रीनिवास विरगोनवार,अमोल मुक्कावार नगरसेवक अहेरी, आलापल्ली ग्रामपंचायत सदस्य स्वप्नील श्रीरामवार, सुमितजी मोतकूरवार,अनुराग बेझलवार,श्रीनिवास चटारे नकगरसेवक अहेरी, धनंजय मंथनवर,तुषार पारेलीवर, संतोष येनमूलवार, शैलेश गेडाम अनेक कार्यकर्त तसेच शाळेचे मुख्याध्यापक संजय चौधरी, पंकज सरोदे, इतर कर्मचारी वृंद उपस्थित होते..

Previous articleसेरेब्रल पाल्सीच्या बालकांना आधार द्या – डॉ. सुवर्णा हुबेकर
Next articleढिवर/कहार समाजाचा मेळावा तुमसर येथे – समाजाच्या प्रमुख मागण्यांवर चर्चा