गोंदिया : तालुक्यातील अर्जुनी व मोगर्रा येथे महिला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने बूथ कमेटीची बैठक नुकतीच संपन्न झाली. खा. प्रफुल पटेल यांच्या निर्देशानुसार आणि माजी आमदारांच्या मार्गदर्शनात ही बैठक घेण्यात आली. जिल्हा समाजकल्याण सभापती सौ. पूजा अखिलेश सेठ आणि पंचायत समिती सदस्या सौ. सरला चिखलोंडे यांच्या प्रमुख उपस्थितीत या बैठकीत महिला पदाधिकारी व सदस्यांनी सहभाग घेतला.
बैठकीत सौ. पूजा सेठ यांनी महायुती सरकारच्या लाडली बहीण योजनेबद्दल महिलांना स्वावलंबी आणि आत्मनिर्भर बनविण्याचे महत्त्व सांगितले. तसेच अजित पवार यांनी दिलेल्या आश्वासनानुसार, माहे ऑक्टोबर व नोव्हेंबर महिन्याचे भाऊबीज ओवाळणीचे पैसे महिलांच्या खात्यात जमा झाल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. त्याच वेळी, विरोधकांकडून महिलांमध्ये भ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न होत असल्याचेही त्यांनी नमूद केले.
सौ. सरला चिखलोंडे यांनी प्रत्येक बूथवर महिलांचे संघटन मजबूत करण्याचे आणि पक्षात महिलांचा अधिकाधिक सहभाग वाढवण्याचे महत्त्व सांगितले. त्यांनी महिलांना पक्षाच्या संघटनेत सक्रिय भूमिका घेण्यासाठी आणि पक्षाच्या महिलांची संख्या वाढवण्यासाठी कार्य करण्याचे आवाहन केले.
बैठकीला मोठ्या संख्येने महिला कार्यकर्त्यांनी सहभाग घेतला. सहभागी महिला कार्यकर्त्यांची नावे खालीलप्रमाणे आहेत:पूजा अखिलेश सेठ, सरला चिखलोंडे, राखी रंधाये, मनीशा रंधाये, आशा रंधाये, योगिता मेश्राम, संगीता मेश्राम, प्रमिला मेश्राम, सुकवार रंधाये, फुलवंता रंधाये, कविता राऊत, जयवंता राऊत, रामलीला चौधरी, गीता साऊसाकडे, कांता घोरमारे, सुलेखा उपवंशी, मीना नागपुरे, भूमेश्वरी नागपुरे, ललिता रंधाये, देवला रंधाये, खेळणं रंधाये, कलावंती घोडमारे, उर्मिला मेश्राम, सरिता राऊत, चंद्रकला राऊत, सुंदर राऊत, जयवंता राऊत, पंचफुला राऊत, प्रमिला मेश्राम, रेणुका बिरनवार, कल्पना घोरमारे, वच्छला घोरमारे, सोनीबाई मेश्राम, मालती चौधरी, उर्मिला घोरमारे, जरामत घोरमारे, रमण पारेवार, अरुणा पारेवार, भूमेश्वरी उपवंशी, निर्मला नागपुरे, गंगोत्री गौतम, शारदा बिसेन, रुमनबाई, रीना हरिणखेडे, चिंतनबाई टेम्भरे, रूणीता चौहान, रोशनी गौतम, सुरेखा गौतम, छाया गौतम, सरला पटले, रेखाताई बोपचे, रीना पटले, गुणवंती खैरवार, लक्ष्मी खैरवार, माया पटले, शिशुकला पटले, ललिता खैरवार, अनिता गौतम, शकुंतला बिसेन, अनिता हरिणखेडे, कांतन गौतम, गुणनबाई गौतम, मनीषा पटले, ज्योती पटले, निलवंता पटले, पुष्पा पटले, सुषमा पटले, रेखा तूरकर, जयवंता गौतम, शंभू पटले, देबीलाल पटले, हेमराज पटले, नारायण पटले, विजय रहांगडाले, शंकर पटले, कोमल नंदगावली, तेजलाल गौतम, प्रेमलाल चौधरी, कन्हय्यालाल पटले, देबिलाल गौतम, अंकेष हरिणखेडे, डुलेंड गौतम, हितेश पटले, संजय भगत, चंद्रशेखर रहांगडाले, भजेंद्र तूरकर, अनिल पटले, घनश्याम पटले, देवेंद्र पटले, निर्मला पटले, भागरता केवट, ललिता रहांगडाले.
या महिलांनी पक्षाच्या संघटन वाढीसाठी आणि आगामी कार्यक्रमांसाठी महत्त्वपूर्ण भूमिका बजावण्याचा निर्धार व्यक्त केला.