जिल्हा प्रतिनिधी/ सतीश पटले
मच्छीमार ढीवर व कहार समाज समन्वय समिती तुमसर व मोहाडी च्या संयुक्त वतीने मच्छीमार समाजाचा मेळावा राजाराम लॉन तुमसर येथे आज 7 ऑक्टोबरला 11 वा. आयोजित करण्यात आला आहे. या मेळाव्याचे उद्घाटन मच्छीमार समाजाचे जिल्हा प्रतिनिधी राजकुमार मोहनकर यांच्या अध्यक्षतेखाली तुमसर मोहाडी विधानसभा क्षेत्राचे आमदार राजू कारेमोरे यांच्या हस्ते पार पडणार आहे. सदर मेळाव्याला लेखक दिनानाथ वाघमारे, सेवानिवृत्त संचालक प्रकाश डायरे व एकलव्य सेनेचे संजय भुरे यांचे मार्गदर्शन लाभणार आहे.तर डॉ. अविनाश नान्हे, सुनिता मोहनकर, दुर्योधन उईके, सुरेश खंगार, अविनाश मांढरे, प्रकाश महालगावे, ईश्वर मेश्राम, अर्चना मोहनकर, चांगोजी मेश्राम, बळीराम नान्हे व सुरेश मांढरे प्रामुख्याने उपस्थित राहणार आहेत. मच्छीमार समाजाला यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत व वैयक्तिक घरकुल योजनेची भरीव निधी देण्यात यावी, 2021- 22 ची मच्छीमारांची अतिवृष्टी निधी तत्काळ देण्यात यावी, जंगल झुडुपी जागेवरील लोकांना घरांचे पट्टे देण्यात यावे, मच्छीमार समाजाचा राज्य सरकारने बजेट वाढवावा, मच्छीमार समाजाला स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये आरक्षण देण्यात यावे, भंडारा जिल्ह्यातील तलावावरील अतिक्रमण काढण्यात यावे व मच्छीमारांच्या हयात असलेल्या योजनेची अंमलबजावणी करण्यात यावी या मागणीच्या पूर्ततेसाठी मच्छीमार समाजाचा मेळावा आयोजित केला जिल्ह्यातील सर्व मच्छीमार समाज बांधवांनी या मेळाव्याला उपस्थित राहण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे.

