फटाका विक्री परवान्यासाठी अर्ज २५ ऑक्टोबर पर्यंत..

0
100
1

गडचिरोली,(जिमाका)दि.08: तात्पुरता फटाका साठवणुक व विक्रीसाठी परवाना असणे बंधनकारक असून दिवाळी सणानिमित्य ज्यांना फटाका विक्री परवानाची (पंधरा दिवसाच्या मुदतीकरीता)आवश्यकता आहे, त्यांनी जिल्हादंडाधिकारी तथा जिल्हाधिकारी गडचिरोली यांचे कार्यालयात दिनांक 25 ऑक्टोबर 2024 पूर्वी विहीत नमुण्यात अर्ज सादर करण्याचे आवाहन जिल्हा प्रशासनातर्फे करण्यात आले आहे. परवान्यासाठी सर्वांना नव्याने अर्ज करणे बंधनकारक राहील.

*अर्जासोबत आवश्यक कागदपत्रे* : विहित नमुन्यातील (फॉर्म एई-5) अर्ज, पोलिस विभागाकडून प्राप्त चारित्र्य प्रमाणपत्र, संबंधीत तहसिलदार यांचा अहवाल व नाहरकत प्रमाणपत्र, फटाका विक्री व साठवणुकिची नियोजित जागा सुरक्षीत असल्याबाबतचे संबंधीत नगरपरिषद/ग्रामपंचायतीचे नाहरकत प्रमाणपत्र, फटाका साठवणुकीच्या इमारतीचा अभिलेख, अर्जदाराचे आधार कार्ड व दोन छायाचित्र, इमारत/खुली जागा स्वत:च्या मालकीची नसल्यास जमीन/घर मालकाचे संमतीपत्र सादर करणे आवश्यक राहील.