आसोली जि. प. राष्ट्रवादी काँग्रेसच्या सभेत कार्यकर्त्यांचा मोठा प्रतिसाद

0
181
1

गोंदिया : राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष गोंदिया तालुका आसोली जि.प. क्षेत्रातील पक्ष पदाधिकारी व कार्यकर्त्यांची संघटनात्मक बैठक ग्राम मोरवाही येथे माजी आमदार श्री राजेंद्र जैन यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. श्री सुरेश कावळे यांच्या निवासस्थानी आयोजित या सभेत माजी आमदार राजेंद्र जैन यांनी सर्व उपस्थितांना नवरात्रोत्सवाच्या शुभेच्छा दिल्या व मां जगदंबा दुर्गाचे आशीर्वाद लाभून सर्वांचे जीवन मंगलमय होवो, अशी मनोकामना व्यक्त केली.

राजेंद्र जैन यांनी आपल्या भाषणात राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये असलेला उत्साह आणि जोश अधोरेखित करत, पक्षाचे कार्यकर्ते कुठेही कमी नसल्याचे सांगितले. त्यांनी आगामी विधानसभा निवडणुकीत पक्षाच्या यशासाठी सर्वांनी जोमाने काम करण्याचे आवाहन केले. माजी आमदारांनी शेतकऱ्यांचे कैवारी आणि जनसामान्यांचा आधार असलेल्या खा. प्रफुल पटेल यांच्या नेतृत्वावर भर देत, त्यांच्या पाठीशी उभे राहून क्षेत्राच्या विकासासाठी योगदान देण्याची अपेक्षा व्यक्त केली.

बैठकीत प्रमुख पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने हजेरी लावली. यात प्रमुख उपस्थितांमध्ये श्री कुंदनभाऊ कटारे, रविकुमार पटले, अखिलेश सेठ, संदिप मेश्राम, चुन्नीलाल सहारे, बिरजूलाताई भेलावे, शोभाताई गणवीर, भूमिका गड़पायले, सयाराम भेलावे, सुरेश कावळे, रामू चूटे, भाकरे जी, नितीन गणवीर, गणेश अगडे, मधोराव शिवणकर, नंदकिशोर ब्राम्हणकर, भूमेश्वर शेंडे, घनश्याम शिवणकर, शंकर करंजेकर, योगराज गौतम, गंगाराम कापसे, चैनलाल दमाहे, मनोहर पटले, जियालाल पटले, पुरण उके, डॉ फरकुंडे, धम्मादिप गणवीर, सयासराम उपवांशी, गणेश फुंडे, प्रेमलाल भांडारकर, सुरेंद्र रीनायित, अशोक ब्राह्मणकर, डॉ शिवणकर, बाळु शिवणकर, सेवकराम रीनाईत, राजू गायधने, सुनिल पटले, शैलेश वासनिक, रौनक ठाकुर, संतोष ठाकुर, ध्रुवदास ठाकुर, डूलिराम भाकरे, इंद्राराज शिवणकर, सुरेश चुटे, उमेश मुनेश्वर, फुलीचंद खवासे, रुपालाल खोटेले, भारत पंधराम, ग्यानिराम वंजारी, दिपक हूकरे, राजकुमार गणवीर, किशोर पारधी, आत्माराम ठाकुर, पप्पू टेंभरे, प्रेमलाल भांडारकर, गोपाल कुंभरे, सुकचंद भलावी, संजय मेश्राम, राजेश शिवणकर, जैयलाल मेंढे, रामेश्वर खोटेले, राधेश्याम मूनेश्वर, तुकाराम कोरे, शिवदत्त टेकाम, डूडीराम ठाकुर, राजू सतदेवे, विक्की भांडारकर, शैलेश मेंढे, छंनु हेमने, कमल ठकरेले, राजू चौहाण, गोपाल डोये, नीलकंठ हेमने, इनीलाल बिशेन, गुनिराम कावळे, श्यामराव कावळे, राजेश कावळे, बाबू लाल भांडारकर, राजेश शिवणकर, अनमोल ब्राह्मणकर यांचा समावेश होता.

या बैठकीत उपस्थित सर्व कार्यकर्त्यांनी आगामी निवडणुकीसाठी जोमाने काम करण्याची तयारी दर्शवली आणि पक्षासाठी अखंड निष्ठा व्यक्त केली.