राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा विजयादशमी उत्सव 13 ऑक्टोबर रोजी

0
198

पथसंचलन 12 ऑक्टोबरला

आमगांव: राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा वार्षिक विजयादशमी उत्सव आणि शस्त्रपूजन कार्यक्रम यावर्षी आश्विन शुक्ल 10, रविवार, दिनांक 13 ऑक्टोबर 2024 रोजी सायंकाळी 6 वाजता रजवाडा पैलेस (जमीदार वाडा) मैदानावर संपन्न होणार आहे. हा कार्यक्रम संघाच्या परंपरेत अत्यंत महत्त्वपूर्ण मानला जातो.

या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी म्हणून सेवानिवृत्त जिल्हा उपनिबंधक अँड. लखनसिंह कटरे (आमगांव, बोरकन्हार) उपस्थित राहणार आहेत. याशिवाय कार्यक्रमाचे प्रमुख वक्ता रा.स्व.संघाचे सेवा विभाग प्रचारक अभिषेक मिश्रा हे असतील.

कार्यक्रमाच्या आधी, दिनांक 12 ऑक्टोबर 2024 रोजी सर्व स्वयंसेवकांचा संघ गणवेष परिधान करून घोषपथकासह पथसंचलन होणार आहे. हे पथसंचलन रजवाडा पैलेस येथून सुरू होऊन नटराज मार्ग, गांधी चौक, संत जगनाडे चौक, पोलिस स्टेशन मार्ग, बनिया मोहल्ला मार्गे परत रजवाडा पैलेस येथे समाप्त होईल.

 या उत्सवात जास्तीत जास्त नागरिकांनी, विशेषतः महिला आणि तरुणींनी सहभागी होण्याचे आवाहन तालुका संघचालक निताराम अंबुले आणि नगर कार्यवाह आमोद आकांत यांनी केले आहे.