गडचिरोली दि.९ : अनुसूचित क्षेत्रातील (पेसा) तलाठी पदभरती-२०२३ च्या निवड यादीतील ८८ उमेदवारांच्या कागदपत्रांची ८ ऑक्टोबर रोजी पडताळणी करून त्यांना मासिक मानधन तत्वावर नियुक्ती आदेश देण्यात आले आहेत.
अनुसूचित क्षेत्रातील (पेसा) 17 संवर्गातील सरळसेवेच्या पदांबाबत जाहिरातीनुसार सुरु झालेल्या भरती प्रक्रिया उमेदवार निवडीच्या अंतिम टप्प्यापर्यंत येऊन पोहचल्या होत्या. काही विभागांनी निवड प्रक्रियेचा अंतिम निकाल जाहिर केला होता, तर काही विभागांमार्फत निवडप्रक्रियेचा निकाल तयार झाला होता. परंतु जाहिर झाला नव्हता. पेसा क्षेत्रातील पदे 1 वर्षापासून रिक्त असल्याने सदर पदे तातडीने भरण्यासाठी 05 ऑक्टोबर, 2024 च्या शासन निर्णयानुसार परवानगी मिळाली होती. यानुसार तातडीने कार्यवाही करून नियुक्ती आदेश निर्गमित करण्यात आले असल्याचे जिल्हाधिकारी यांनी कळविले आहे.