जिल्हा प्रतिनिधी/ सतीश पटले
मोहाडी तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पांजरा (ग्रामदान) येथे शाळा दुरुस्तीसाठी ५ लाख रूपये मंजूर झाले असून या कामाचे भूमिपूजन भंडारा जिल्हा परिषद शिक्षण व आरोग्य सभापती रमेश पारधी यांच्या हस्ते पार पडले. याप्रसंगी काँग्रेस कमिटी मोहाडी तालुकाध्यक्ष राजेश हटवार, काँग्रेस कमिटी जिल्हा महासचिव गजानन झंझाड, काँग्रेस कमिटी तुमसर तालुकाध्यक्ष प्रमोद कटरे, शशिकांत नागपासे, सरपंच महेंद्र मते, प्रवीण सेलोकर, रामदास खडसे, जसवंत पिंगरे तसेच शिक्षक वृंद व शाळा व्यवस्थापन समितीचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.