सालेकसा : बाजीराव तरोने
देशातील औद्योगिक क्षेत्रात अपार योगदान देणारे आणि भारताला आर्थिक दृष्ट्या प्रगतीच्या मार्गावर नेणारे महान उद्योजक स्वर्गीय रतन टाटा यांच्या निधनाने देशभरात शोककळा पसरली आहे. त्यांच्या स्मरणार्थ सालेकसा येथील मित्र परिवाराने शोकसभा आयोजित करून त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली.
लखनलाल अग्रवाल यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित या शोकसभेत उपस्थित सर्व ज्येष्ठ नागरिकांनी रतन टाटा यांच्या जीवनचरित्रावर आपल्या भावना व्यक्त केल्या. त्यावेळी उपस्थितांनी त्यांच्या उद्योजकीय योगदानाचे महत्त्व अधोरेखित करत, त्यांच्या समाजकार्य आणि आर्थिक योगदानाचे कौतुक केले.
सभेला विनोद जैन, सुशील असाटी, ब्रजभूषण बैस, विजय फुंडे, शैलेश बहेकार, आदित्य शर्मा, मायकल मेश्राम, मुकेश बैस, देवचंद ढेकवार, प्रा. राकेश रोकडे, बाजीराव तरोने, राहुल टेंभरे, देवराज मरसकोल्हे, विनोद वैद्य, अंकुश सुर्यवंशी, गणेश खोटेले, सचिन सेउतकर, राजू टेंभूर्णीकर आणि इतर गावकरी व मित्र परिवारातील सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या शोकसभेच्या निमित्ताने रतन टाटा यांच्या व्यक्तिमत्त्वाच्या विविध पैलूंवर चर्चा झाली. त्यांच्या शांत, परोपकारी स्वभावाची आणि उच्च मूल्यांची प्रशंसा करताना उपस्थितांनी त्यांचे आदर्श आपल्या आयुष्यात जोपासण्याची प्रतिज्ञा घेतली.

