गोंदिया : दि.१० ऑक्टोबर रोजी राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने रेलटोली येथील पक्ष कार्यालयात महान उद्योजक, समाजसेवक आणि उदारमतवादी व्यक्तिमत्त्व स्व. रतन टाटा यांच्या तैलचित्राला माल्यार्पण करून भावपूर्ण श्रद्धांजली वाहण्यात आली. या प्रसंगी माजी आमदार राजेंद्र जैन यांनी आपल्या मनोगतात स्व. रतन टाटा यांचे भारतीय उद्योगक्षेत्रातील योगदान आणि दूरदृष्टीचे महत्व अधोरेखित केले.
जैन यांनी म्हटले की, रतन टाटा यांच्या अलौकिक व्यक्तिमत्त्वामुळे आणि दूरदृष्टीमुळे खऱ्या अर्थाने मेड इन इंडिया वस्तू संपूर्ण जगभर पसरल्या. त्यांच्या कार्याची आणि आदर्शांची आठवण आपल्या मनात कायमस्वरूपी राहील. उपस्थित सर्व कार्यकर्त्यांनी मौन धारण करून त्यांच्या आत्म्याला शांती लाभो आणि त्यांच्या कुटुंबियांना या कठीण काळात धैर्य मिळो, अशी प्रार्थना केली.
या श्रद्धांजली कार्यक्रमात राजेंद्र जैन, विनोद हरिणखेड़े, छोटुभाऊ पटले, अशोक सहारे, रफीक खान, रवि पटले, दिनेश अग्रवाल, अखिलेश सेठ, माधुरी नासरे, आशा पाटील, शर्मिला पाल, उषा मेश्राम, भगत ठकरानी, हरिराम आसवानी, शंकर टेंभरे, विजेंद्र जैन, टी. एम. पटले, सुनील पटले, शैलेश वासनिक, नागों सरकार, त्रिलोक तुरकर, रमेश कुरील, लवली होरा, रमन उके, लव माटे, कपिल बावनथड़े, कुणाल बावनथड़े, अनुज जैसवाल, एकनाथ वहिले, रौनक ठाकुर, राज शुक्ला, प्रतीक पारधी, अजय जैसवाल, बंटी गड़पायले, दिलप्रीत होरा, दीपक कनोजे, नरेंद्र बेलगे यांसह पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.