आमगांव : बुलडाणा अर्बन को-ऑपरेटिव्ह बँकेचे मुख्य व्यवस्थापकीय संचालक डॉ. सुकेश झंवर यांच्या वाढदिवसानिमित्त, गोंदिया विभागाच्या आमगाव शाखेतर्फे जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, इंदिरानगर येथे विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य आणि मिठाई वाटपाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला.
या उपक्रमाचे आयोजन विभागीय व्यवस्थापक अनिल वानखेडे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले. शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. सविता भुरे मॅडम, शिक्षक राजकुमार मेश्राम, अध्यक्ष प्राचार्य व्ही. डी. मेश्राम, प्राचार्य जी. एम. येळे यांच्यासह शाखा व्यवस्थापक आशिष बिसेन, लिपिक तुषार रहांगडाले, कैलाश येळे, रितिका तिवारी आणि विक्रम उके यांनी विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वितरण केले.
प्रमुख पाहुण्यांनी डॉ. सुकेश झंवर यांना वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देत विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीसाठी शुभेच्छा व्यक्त केल्या.