डांगोरली उपसा सिंचन प्रकल्पामुळे परिसर होणार सुजलाम सुफलाम खा. प्रफुल पटेल यांच्या प्रयत्नाला यश – ३९५ कोटींच्या प्रशासकीय मान्यतेला मंजुरी

0
183

गोंदिया तालुक्यातील शेतकऱ्यांना होणार मोठा लाभ

गोंदिया तालुक्यातील ५९६१ हेक्टर जमिनीचे सिंचन, शेतकऱ्यांना दिलासा

गोंदिया : वैनगंगा नदीवर रखडलेला डांगोरली उपसा सिंचन प्रकल्प अखेर मार्गी लागला आहे. खा. प्रफुल पटेल यांच्या अथक प्रयत्नांमुळे या प्रकल्पाला ३९५ कोटी रुपयांच्या निधीसह प्रशासकीय मान्यता मिळाली आहे. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि उपमुख्यमंत्री तथा जलसंपदा मंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सहकार्याने मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा महत्वाचा निर्णय घेण्यात आला. या प्रकल्पामुळे डांगोरली व आसपासच्या गावांतील सुमारे ५९६१ हेक्टर जमिनीचे सिंचन होणार आहे.

प्रकल्पाच्या मान्यतेसाठी खा. प्रफुल पटेल यांचे प्रयत्न
डांगोरली उपसा सिंचन प्रकल्प हा वैनगंगा नदीवर उच्च पातळी बंधारा उभारून परिसरातील शेतीला पाणीपुरवठा करण्यासाठी महत्त्वाकांक्षी योजना आहे. मात्र निधीअभावी हा प्रकल्प गेल्या अनेक वर्षांपासून रखडला होता. या प्रकल्पाच्या निधीसाठी शेतकऱ्यांच्या मागणीनंतर खा. प्रफुल पटेल यांनी सातत्याने मुख्यमंत्री आणि जलसंपदा मंत्र्यांशी संपर्क साधत पाठपुरावा केला. अखेर त्यांच्या प्रयत्नांना यश आले आणि या प्रकल्पासाठी ३९५ कोटी रुपये मंजूर करण्यात आले.

शेतकऱ्यांना होणार मोठा लाभ
डांगोरली व आसपासच्या परिसरातील शेतकऱ्यांना या प्रकल्पामुळे मोठा लाभ होणार आहे. सुमारे ५९६१ हेक्टर जमिनीचे सिंचन होईल, ज्यामुळे विविध प्रकारच्या पिकांचे उत्पादन होण्यास मदत होईल. परिणामी, शेती उत्पन्नात वाढ होऊन शेतकरी सुजलाम सुफलाम होणार आहेत. शेतीत सुधारणा होण्याबरोबरच आर्थिक परिस्थितीतही सकारात्मक बदल दिसून येईल.

शेतकऱ्यांचे आभार आणि अपेक्षा
प्रकल्प मंजुरी मिळाल्यानंतर परिसरातील शेतकऱ्यांनी खा. प्रफुल पटेल आणि राज्य सरकारचे आभार मानले आहेत. यामुळे शेतीसाठी आवश्यक असणारा पाण्याचा प्रश्न सुटणार असून भविष्यात उत्पादनात मोठी वाढ होईल, अशी शेतकऱ्यांची अपेक्षा  आहे.

 

Previous articleडॉ. सुकेश झंवर यांच्या वाढदिवसानिमित्त शैक्षणिक साहित्य व मिठाई वाटप
Next articleअल्पवयीन मुलीवर अत्याचार, आरोपीला अटक