अल्पवयीन मुलीवर अत्याचार, आरोपीला अटक

0
864
1

कातुर्ली गावातील धक्कादायक घटना, पोलिसांच्या त्वरित कारवाईने आरोपीला अटक

आमगाव :  पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या कातुर्ली गावात दि.10 ऑक्टोबर रोजी दुपारी एक हृदयद्रावक घटना घडली आहे. 45 वर्षीय राधेश्याम बहेकार या नराधमाने घराशेजारी राहणाऱ्या सहा वर्षीय चिमुकलीवर अत्याचार केल्याचे उघड झाले आहे. पीडित मुलीने आपल्या घरच्यांना या अमानुष घटनेची माहिती दिल्यानंतर पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली.

घटना आणि पोलिसांची त्वरित कारवाई : या घटनेनंतर पोलिसांनी तत्काळ हालचाली करून रात्रीच्या वेळी आरोपी राधेश्याम बहेकारला अटक केली आहे. आमगाव पोलीस स्टेशन अंतर्गत हा गुन्हा नोंदवण्यात आला आहे. आरोपीवर भारतीय दंड संहिता कलम 65/2 आणि पॉक्सो कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस अधीक्षक गोरख भामरे, अप्पर पोलीस अधीक्षक नित्यानंद झा, उपविभागीय पोलीस अधिकारी प्रमोद मडामे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक तिरुपती राणे आणि पोलीस उपनिरीक्षक दिपाली साळुंके करीत आहेत.

या अमानुष घटनेने कातुर्ली गावात प्रचंड संताप निर्माण झाला आहे. गावकऱ्यांनी आरोपीला कठोर शिक्षा होण्याची मागणी केली आहे.