उद्योगपती रतन टाटा यांना भावपूर्ण श्रद्धांजली – राजीव गांधी समाजकार्य महाविद्यालय, गोंदिया येथे आयोजन

0
126
1

गोंदिया : उद्योग जगातील प्रख्यात व्यक्तिमत्व, दानवीर व दानशूर रतन टाटा यांना राजीव गांधी समाजकार्य महाविद्यालय, गोंदिया येथे भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. रतन टाटा यांचे नाव भारताबाहेरही ओळखले जाते. त्यांच्या नेतृत्वाखाली उद्योग क्षेत्रात त्यांनी केलेले योगदान अमूल्य आहे. त्याचसोबत, सामाजिक क्षेत्रातही त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली आहे. जेव्हा जेव्हा देशावर संकट आले, मग तो 26/11 चा मुंबईवरील हल्ला असो किंवा कोरोनासारखी जागतिक महामारी, रतन टाटा नेहमीच देशहितासाठी पुढे आले.

त्यांनी शिक्षण क्षेत्रात देखील महत्त्वाचे योगदान दिले आहे. टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेस (TISS) या नावाने 1936 साली मुंबईत व्यावसायिक समाजकार्य शिक्षणाची सुरुवात करण्यात आली, ज्याचा पाया त्यांनी घातला.

या महान व्यक्तिमत्त्वाला श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी राजीव गांधी समाजकार्य महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. मंगला कटरे यांच्या अध्यक्षतेखाली कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या प्रसंगी महाविद्यालयाचे अनेक पदाधिकारी आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कार्यक्रमात मान्यवरांमध्ये सौ. संगीता घोष मॅडम,  आनंद पटले, अविनाश कुंभलवार, दीपक भोयर, दीपक गाढवे,  बिष्णू चौधरी,  ब्रिजेश तिवारी आणि वीरेंद्र चन्ने यांची प्रमुख उपस्थिती होती.

या कार्यक्रमात रतन टाटा यांच्या जीवनकार्यावर प्रकाश टाकण्यात आला व त्यांच्या समाजकार्याच्या योगदानाबद्दल उपस्थितांनी त्यांना आदरांजली अर्पण केली. महाविद्यालयाच्या सर्व विद्यार्थी-विद्यार्थिनींनी देखील मोठ्या आदराने रतन टाटा यांना श्रद्धांजली वाहिली.

कार्यक्रमाच्या शेवटी प्राचार्या डॉ. मंगला कटरे यांनी रतन टाटा यांच्या विचारांचा आदर्श विद्यार्थ्यांनी घ्यावा आणि समाजकार्यात योगदान देण्याचे आवाहन केले.