गोंदिया, 13 ऑक्टोबर : जिल्ह्यात सणांचा काळ आणि विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गुन्हेगारीवर आळा घालण्यासाठी पोलीस प्रशासनाने चार अट्टल गुन्हेगारांवर हद्दपारीची कठोर कारवाई केली आहे. जिल्ह्यातील शांतता आणि सुव्यवस्था कायम राखण्यासाठी, तसेच वाढत्या गुन्हेगारीला आळा बसावा म्हणून उपविभागीय दंडाधिकारी, देवरी यांच्या आदेशानुसार, आमगाव पोलीस ठाणे हद्दीतील चार कुख्यात गुन्हेगारांना दोन महिन्यांसाठी आमगाव उपविभाग, देवरी तालुका, आणि सालेकसा तालुक्यातून हद्दपार करण्यात आले आहे.
पोलीस अधीक्षकांच्या निर्देशानुसार , दिवाळी सण, आणि आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील शांतता व सुव्यवस्था अबाधित राखणे, गुन्हेगारीला आळा घालणे, आणि गुन्हेगारी प्रवृत्तींवर कडक नजर ठेवणे हे उद्दिष्ट ठेवून ही कारवाई करण्यात आली आहे.
हद्दपार करण्यात आलेल्या गुन्हेगारांची यादी:
1. चंद्रकांत गणेश बोरकर (वय 22), राहणार माणेकसा, ता. आमगाव:
गुन्हेगारी स्वरूप: अवैधरित्या देशी दारू विक्री, गावात दहशत निर्माण करणे, लोकांना धमकावणे, मारहाण करणे, अल्पवयीन मुलीचा विनयभंग, शिवीगाळ. या सर्व गुन्ह्यांत आमगाव पोलीस ठाण्यात चार गंभीर गुन्हे नोंद आहेत.2. अभिषेक वासुदेव फुंडे (वय 26), राहणार बोथली, ता. आमगाव:
गुन्हेगारी स्वरूप: महिलांना धमकावणे, छेडछाड, मारामारी, कुटुंबीयांसोबत भांडणे, चोरी करणे. या गुन्ह्यांसाठी आमगाव पोलीस ठाण्यात चार गुन्हे नोंदवलेले आहेत.3. धर्मेंद्र उर्फ कोल्या रामचंद मेश्राम (वय 35), राहणार रिसामा, ता. आमगाव:
गुन्हेगारी स्वरूप: अवैध दारू विक्री, चोरी, रात्रीच्या वेळी घरफोडी, दारू पिऊन सार्वजनिक ठिकाणी गोंधळ घालणे. त्याच्या विरुद्ध पाच गुन्हे दाखल आहेत. एका प्रकरणात न्यायालयाने 500 रुपये दंड आणि 15 दिवसांची शिक्षा दिली आहे.4. सुनीता उर्फ रोशनी राजकुमार उर्फ राकेश शेंडे (वय 43), राहणार तिगाव, ता. आमगाव:
गुन्हेगारी स्वरूप: अवैध दारू विक्रीचे पाच गुन्हे नोंदवलेले असून तिच्या दारू विक्रीमुळे गावातील प्रतिष्ठित नागरिकांना त्रास होत आहे. तिच्या या कृतीमुळे सार्वजनिक शांतता भंग होत असल्याचे वारंवार घडले आहे.
पोलीस निरीक्षक तिरुपती राणे यांनी महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 च्या कलम 56(1)(अ)(ब) अंतर्गत हद्दपारीसाठी प्रस्ताव तयार केला होता. उपविभागीय दंडाधिकारी देवरी यांच्या आदेशानुसार ही कारवाई करण्यात आली. गुन्हेगारांवर प्राथमिक चौकशी करून त्यांना गोंदिया, भंडारा, आणि गडचिरोली या जिल्ह्यांमधूनही दोन महिन्यांसाठी हद्दपार करण्यात आले आहे.
वरिष्ठ अधिकाऱ्यांचे मार्गदर्शन आणि सहभाग:
या कारवाईमध्ये पोलीस अधीक्षक मा. गोरख भामरे, अप्पर पोलीस अधीक्षक मा.नित्यानंद झा, आणि उपविभागीय पोलीस अधिकारी मा.प्रमोद मडामे यांनी महत्त्वपूर्ण मार्गदर्शन केले. तसेच, पोलीस निरीक्षक मा. तिरुपती राणे, दिनेश लबडे, आणि इतर पोलीस कर्मचारी यांच्या सहभागाने ही कारवाई यशस्वीपणे पूर्ण करण्यात आली.
सहभागी अधिकारी आणि कर्मचारी:
सदर कारवाईमध्ये पोलीस कर्मचारी यशोदा नाईक, विनिशा बहेकार, राजू गजपुरे, योगेश उईके, खुशालचंद बर्वे, ममता दसरे, लखीराम दसरे, राजू पंधरे, निलेश भजने, शुभम शेंडे, गौरव बुराडे, स्वप्नील शेंडे, तसेच प्रतिबंधक विभागातील अधिकारी वानिता सायकर, प्रकाश गायधने, दुर्गेश तिवारी यांनी सक्रिय भूमिका बजावली.
गोंदिया जिल्ह्यातील या कठोर हद्दपारीच्या कारवाईने गुन्हेगारी प्रवृत्तीला धडा मिळावा, शांतता आणि सुव्यवस्था अबाधित राहावी, आणि जनमानसात सुरक्षा व विश्वासाची भावना निर्माण व्हावी अशी अपेक्षा आहे.

