2024-2029 कार्यकालासाठी निवडणूक प्रक्रिया जाहीर
गोंदिया : आज दिनांक 13 ऑक्टोबर 2024 रोजी पवार प्रगतिशील मंच, गोंदिया (नोंदणी क्र. 3380(भं)) या संस्थेच्या 2024-2029 या कालावधीसाठी कार्यकारी मंडळाच्या निवडणुकीची अधिकृत घोषणा पवार प्रगतिशील मंच कार्यालय, गोंदिया येथे करण्यात आली. निवडणूक निर्णय अधिकारी खुमेश चैतराम कटरे यांनी संस्थेच्या कार्यालयात दुपारी 2.00 वाजता निवडणूक प्रक्रिया सुरू होण्याची घोषणा केली. या वेळी संस्थेचे अध्यक्ष अँड. पृथ्वीराज चव्हाण, सचिव डॉ. प्रीती गौतम ,पन्नालाल ठाकरे, बंटी बोपचे, अजय रहांगडाले, सुरेश पटले , संजय रहांगडाले, पंकज पटेल हेमंत बघेले, रजत ठाकुर,किशोर भगत व इतर कार्यकारी मंडळाचे सदस्य तसेच अनेक आजीवन सदस्य उपस्थित होते.
कार्यकारी मंडळाच्या निवडणुकीमध्ये संस्थेच्या भविष्यासाठी महत्त्वाच्या निर्णयांची आखणी केली जाणार आहे. निवडणूक प्रक्रियेत पारदर्शकता आणि सर्वसमावेशकता राखण्यासाठी विविध योजना आखल्या जाणार आहेत. निवडणूक अधिकारी कटरे यांनी यापूर्वीची निवडणूक प्रक्रिया यशस्वीपणे हाताळली आहे आणि यावेळीही तेच पारदर्शकता राखतील, अशी अपेक्षा आहे.
निवडणुकीचे उद्दिष्ट आणि योजनाबद्धता : संस्थेच्या प्रगतीसाठी आगामी काळात विविध उपक्रम राबवले जाणार आहेत. सामाजिक, शैक्षणिक, आणि सांस्कृतिक क्षेत्रात महत्त्वाचे कार्य हाती घेतले जाईल. विविध प्रकल्पांना चालना देण्यासाठी मंडळाच्या सदस्यांकडून कल्पक आणि निर्णयक्षम नेतृत्वाची अपेक्षा आहे.
संस्थेतील सदस्यांना निवडणुकीत भाग घेऊन आपला हक्क बजावण्याचे आवाहन करण्यात आले आहे. प्रत्येक उमेदवाराची सखोल तपासणी करून निवडणूक प्रक्रिया अधिकाधिक पारदर्शक बनवण्याचा निर्धार केला आहे.

