अहेरी: ”जन्मापासून मृत्यूपर्यंत ज्या ज्या काही सरकारी योजना असतील अशा वैयक्तिक अथवा सार्वजनिक लाभाच्या योजनांचा लाभ घ्या,” असे आवाहन राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री धर्मराव बाबा आत्राम यांनी केले.अहेरी तालुक्यातील दुर्गम अश्या छल्लेवाडा येथे सोमवार (१४ ऑक्टोबर) रोजी जनसंवाद व आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.यावेळी अध्यक्षीय स्थानावरून ते बोलत होते.
यावेळी अहेरीचे माजी पंचायत समिती सदस्य हर्षावर्धन बाबा आत्राम,सिनेट सदस्य तनुश्री आत्राम,राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा कार्यकारी अध्यक्ष रियाज शेख,राकॉचे अहेरी विधानसभा अध्यक्ष लक्ष्मण येरावार,राकॉचे महिला जिल्हाध्यक्ष पुष्पा अलोने,अहेरी तालुका अध्यक्ष नागेश मडावी, राष्ट्रवादी महिला काँग्रेसचे अहेरी तालुकाध्यक्ष सारिका गडपल्लीवार,कैलास कोरेत,सांबय्या करपेत,सेवा निवृत्त प्राचार्य रतन दुर्गे,सुरेंद्र अलोने मखमुर शेख,बाबुराव तोरेम, ग्रा प सदस्य विनायक आलाम,अशोक आत्राम,अंकुलू बोरगे, रामचंद्र पोरतेट,चंद्र कुळमेथे आदी मान्यवर उपस्थित होते.
पुढे बोलताना मंत्री आत्राम यांनी सरकारच्या कृषी, आरोग्य, शिक्षण, वीज, बांधकाम आदी विभागाच्या विविध योजना आहेत. एक व्यक्ती वेगवेगळ्या प्रकारचा लाभार्थी होऊ शकतो. ज्येष्ठ नागरिक दिव्यांग, शेती अवजारे, पीक विम्याचा लाभ घ्यावा.एवढेच नव्हेतर महायुतीच्या माध्यमातून मुख्यमंत्री लाडकी बहीण ही अत्यंत महत्वाकांक्षी योजना राबविण्यात येत आहे.संपूर्ण राज्यातील लाडक्या बहिणींना याचा मोठा फायदा होताना दिसत आहे.आपल्या भागातील महिला बघिनींनी देखील मोठ्या प्रमाणात या योजनेचा लाभ घेऊन आपला जीवनमान उंचवावे असे आवाहन त्यांनी केले.
दरम्यान कार्यक्रम स्थळी आगमन होताच मंत्री धर्मराव बाबा आत्राम यांचे गावकऱ्यांनी ढोल ताशांच्या गजरात जल्लोषात स्वागत केले.कार्यक्रमात मंत्री आत्राम यांनी परिसरातील नागरिकांच्या समस्या जाणून घेऊन निवेदन स्वीकारले.संबंधित अधिकाऱ्यांना तात्काळ समस्या सोडविण्याचे निर्देश दिले.
*शेकडो कार्यकर्त्यांचा राकॉ मध्ये प्रवेश*
जनसंवाद व आढावा बैठकीत मंत्री धर्मराव बाबा आत्राम यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून छल्लेवाडा येथील विविध पक्षातील कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) पक्षात प्रवेश घेतला.यावेळी मंत्री धर्मराव बाबा आत्राम यांनी पक्षाचा दुपट्टा गळ्यात टाकत,पुष्पगुच्छ देऊन सर्वांचे स्वागत केले.