अहेरी येथील २५० वर्षाची ऐतिहासिक परंपरा असलेला दसरा महोत्सवात जनतेची हजारोंच्या संख्येने गर्दी..
दसरा मेळाव्यातून अहेरी जिल्हा बनविण्याचा संकल्प करीत राजे अम्ब्रीशरावांचा विरोधकांवर जोरदार हल्लाबोल….
*अहेरी:-* अहेरी इस्टेटच्या दसरा महोत्सवाचे महत्त्व कमी व्हावे, यासाठी अनेक प्रयत्न झाले आणि आता देखील केले जात आहे.मात्र ते कदापी यशस्वी होणार नाही. दसरा ही आपल्या अहेरी इस्टेटची ऐतिहासिक संस्कृती आहे.हा महोत्सव गेल्या २५० वर्षांपासून अखंडपणे सुरू आहे. अगोदर माझ्या समाजात शिक्षणाची कमतरता होती. आजची युवापिढी सुशिक्षित झाली असून विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करीत आहे.असे असलेतरी युवा पिढीने आपली संस्कृती, रूढी परंपरा जपली आहे. पुरातन काळापासून सुरू असलेल्या अहेरी दसरा महोत्सव साजरा करण्यासाठी वयोवृद्धांसह तरुण पिढी आज देखील मोठ्या उत्साहाने अहेरीत दाखल होते, अहेरी राजपरिवाराची हीच खरी कमाई आहे. काळ बदलला असला तरी अहेरीची दसऱ्याची परंपरा मात्र कायम असल्याचे सांगत अहेरी इस्टेटचे राजे अम्ब्रीशराव आत्राम यांनी विरोधकांवर जोरदार हल्लाबोल केला.
अहेरी इस्टेटच्या २५० वर्षांची ऐतिहासिक परंपरा असलेला दसरा महोत्सवात अहेरी इस्टेटचे ६ वे राजे अम्ब्रिशराव आत्राम यांनी पालखीत विराजमान होऊन गडअहेरी येथे सीमोल्लंघन करून गडी मातेचे तथा शमी वृक्षाचे पूजन केले, या दसरा महोत्सवाला अहेरी राजपरिवाराचे सर्व सदस्य तसेच हजारो लोकांची उपस्थिती होती, रात्री परंपरेप्रमाणे अहेरी इस्टेटचा जनतेला संबोधित करतांना राजे बोलत होते..!!
पुढे बोलताना राजे अम्ब्रीशराव आत्राम विरोधकांवर जोरदार घणाघात केला, सध्या आपल्या भागातील एका नामांकित कंपनीकडून ऐका विशिष्ट व्यक्तीसाठी पुढील विधानसभा निवडणुकीची जोरदार तयारी केली जात आहे, मात्र त्या कंपनीला आपल्या बोटावर नाचणारा प्रतिनिधी हवं आहे, त्यासाठी काही गुन्हेगारी प्रवृत्तीचे दलाल सक्रिय झाले आहे. मात्र, तुम्ही कितीही तयारी करा पैसा आणि यंत्रणा लावा मात्र जनतेची साथ मलाच राहील, निवडून आल्यावर तुम्हाला मात्र मी सोडणार नाही असा सूचक इशारा देखील राजेंनी ह्यावेळी विरोधकांना दिला, तसेच अहेरी जिल्हा बनविण्याचा संकल्प ही राजेंनी ह्यावेळी केला..!!
आपले विद्यमान कॅबिनेट मंत्री सध्या त्यांच कंपनीच्या इशाऱ्यावर चालत आहेत. किंबहुना हेलिकॉप्टर मधून उडत आहेत.ते लवकरच खड्डयात खाली पडल्याचे तुम्हाला दिसणार असल्याचा टोला देखील त्यांनी लगावला. जनतेने त्यांना अखेरची संधी देत मोठ्या अपेक्षेने निवडून दिली. मात्र, त्याच जनतेला त्यांनी मागील पाच वर्षात खड्ड्यात टाकला. सध्या अहेरी विधानसभा क्षेत्रातील पाचही तालुक्यातील रस्त्यांची दयनीय अवस्था झाली आहे.रोजगार देण्याचा नावाखाली तरुण पिढीची थट्टा केली जात आहे. लोहखनिज वाहतूक करणाऱ्या जड वाहनांनी अनेकांची बळी घेतली आहे. विकास कामांच्या निधीतून टक्केवारीचा खेळ चालला आहे.अशी परिस्थिती असताना आपले मंत्री मात्र सिनेमा काढणे, हेलिकॉप्टरने फिरणे,ऐन निवडणुकीच्या तोंडावर मतदारांना आमिष दाखवून विविध भेटवस्तू वाटप करत आहेत.या पाच वर्षात जनतेने त्यांची निष्क्रियता बघितली आहे.त्यामुळे त्यांच्या मनात भीती निर्माण झाली असून आता कंपनीच्या माध्यमातून विविध फंडे वापरले जात आहेत. काही लोकं त्यांच्यासोबत गेली साडेचार वर्षे मलाई वाटून खाल्ले अन् आता आपली वेगळी चूल मांडली. आता जनतेच्या हिताचे बोलायला लागले. मात्र,त्यांचा हा प्लॅन जनतेला कळला आहे.जनतेच्या मनात असणाऱ्या उमेदवाराला कुठल्याही पक्षाची आणि बॅनरबजीची गरज नाही. जनताच आपला योग्य उमेदवार निवडतो आणि विधानसभेत पाठवतो. ती वेळ आली असून अवघ्या काही दिवसात विरोधकांना आपण सुखद धक्का देऊ असेही ते म्हणाले. विशेष म्हणजे दसरा मेळाव्याच्या मंचावरून यावेळी त्यांनी विरोधकांचा चांगलाच खरपूस समाचार घेतला.
*असा साजरा झाला दसरा महोत्सव*
गेल्या तीन दिवसापासून अहेरी दसरा महोत्सवाला सुरुवात झाली.गेली दोन दिवस विविध कार्यक्रम संपन्न झाले. ढोल, ताशे, मशाली घेऊन दसऱ्याच्या दिवशी संध्याकाळी ऐतिहासिक पालखीत विराजमान होवून राजे अम्ब्रिशराव आत्राम यांनी सीमोल्लंघन करीत गडअहेरी येथे शमीच्या वृक्षांचे पूजन तथा गडी मातेचे पूजन करीत पालखी राजमहालात परत आली. त्यांनंतर अहेरी येथील भव्य पटांगणात त्यांनी जनतेला संबोधित केले.
*काय आहे राज घराण्याची परंपरा*
२५० वर्षांची परंपरा असलेल्या अहेरी राजघराण्यात पहिले राजे म्हणून राजे धर्मराव महाराज, दुसरे राजे भुजंगराव महाराज, तिसरे दानशूर राजे धर्मराव महाराज, चौथे राजे विश्वेश्वरराव महाराज त्यानंतर राजे सत्यवानराव महाराज आणि आता सहावे राजे अम्ब्रीशराव महाराज राजगादीवर विराजमान झाले आहेत. राजे सत्यवानराव महाराज यांचे निधन झाल्यानंतर राजे अम्ब्रीशराव महाराजांचा राज्याभिषेक सोहळा थाटात पार पडला, तेव्हा ते अवघे २५ वर्षांचे होते. नागपूर, पुणे, पंचगणी येथील नामांकित शाळांमधून शिक्षण घेतल्यानंतर इंग्लडला जाऊन बिझनेस लॉ ची पदवी प्राप्त केलेल्या अम्ब्रीशराव महाराजांना युवा पिढीच्या ह्दयात मानाचे स्थान आहे. त्यांचा शांत, संयमी आणि प्रेमळ स्वभाव तसेच दानशूर वृत्ती यामुळे ते लवकरच लोकप्रीय झाले. सध्या अहेरी इस्टेटचे सहावे राजे म्हणून त्यांच्या हाती सूत्रे आली आहेत.ही परंपरा कायम राखत त्यांच्या मार्गदर्शनाखाली दसरा महोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला..

