सालेकसा तालुक्यात अजित पवार गटात नाराजीचा सूर

0
552
1

अनेक कार्यकर्ते दुसऱ्या पक्षात जाण्याच्या वाटेवर

सालेकसा : बाजीराव तरोने

महाराष्ट्राच्या पूर्व टोकावर असलेल्या आदिवासीबहुल क्षेत्र म्हणून ओळखला जाणारा सालेकसा तालुका नेहमीच विकासापासून दूर राहिला आहे. येथील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अजित पवार गटातील कार्यकर्त्यांनी वरिष्ठ पक्षश्रेष्ठींवर नाराजी व्यक्त केली आहे. तालुक्यातील विविध समस्यांवर लक्ष न दिल्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये नाराजीनं वातावरण निर्माण झाले आहे.

पक्षश्रेष्ठींनी कार्यकर्त्यांच्या समस्या समजून घेतल्या नाहीत, तर कार्यकर्ते दुसऱ्या पक्षात जाण्याचा निर्णय घेतील, असा इशारा चर्चासत्र बैठकीत दिला गेला. सालेकसा तालुक्यात अनेक वर्षांपासून पक्ष बळकट करण्यासाठी परिश्रम घेणारे कार्यकर्ते आपले महत्त्व कमी होत असल्याचं जाणवत असल्याने हा नाराजीचा सूर अधिकाधिक ऐकायला येत आहे.

चर्चासत्रात कार्यकर्त्यांचा रोष

अर्धनारेश्वरालय शिवगण मंगल भवन येथे आयोजित चर्चासत्र बैठकीत पक्षातील कार्यकर्त्यांनी आपल्या समस्या मांडल्या. यावेळी कार्यकर्त्यांनी वरिष्ठ नेतृत्वाकडून होणाऱ्या दुर्लक्षामुळे कामांमध्ये अडथळे येत असल्याचं म्हटलं. सालेकसा तालुक्यात जर असाच भेदभाव सुरु राहिला, तर कार्यकर्ते वाटेल ते निर्णय घेण्यास तयार आहेत, असं बैठकीत बोललं गेलं.

अनेक कार्यकर्ते दुसऱ्या पक्षात जाण्याच्या तयारीत

तालुक्यात अनेक वर्षे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासाठी मेहनत करणाऱ्या कार्यकर्त्यांमध्ये सध्या नाराजीची भावना आहे. पक्षश्रेष्ठींनी केलेल्या दुर्लक्षामुळे कार्यकर्त्यांमध्ये असंतोष पसरला असून, काही कार्यकर्ते नवीन राजकीय वाट निवडण्याच्या तयारीत असल्याचं चर्चासत्रात व्यक्त झालं.

उपस्थित मान्यवर आणि कार्यकर्ते

चर्चासत्र बैठक माजी जिल्हा परिषद सदस्य दुर्गा तिराले यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. यावेळी उपस्थित असलेले प्रमुख कार्यकर्ते आणि मान्यवरांची नावे खालीलप्रमाणे आहेत :लक्ष्मण नागपुरे, गोपाल तिराले,दौलत अग्रवाल,कैलास धामडे,राजेश कनोजे,पुस्तकला वरकडे,कमलेश लिल्हारे,सुखदास बसोने,सुरेश अग्रवाल,सेवकराम भलावी,बबीता फुंडे,सुनीता थेर,सीमा अवस्थी,संतोषी चुटे,भुनेश्वरी फुंडे,ओमप्रकाश उपराडे,रामदास वरकडे,मनीष पुसाम,साईद फुंडे,कुवरलाल लील्हारे,भुलेश्वर नागपुरे,गीता चौधरी,उषा टेंभरे,सुनीता येडे,विनोद अग्रवाल,महेश दमाहे,भरत नागपुरे,रघुदास नागपुरे,सुभाष बहेकार,ओमप्रकाश पारधी आणि राधेश्याम गंगभोजउपस्थित होते.

बैठकीत उपस्थित कार्यकर्त्यांनी एकत्रितपणे आपली मागणी मांडली आणि पक्षश्रेष्ठींनी सालेकसा तालुक्याच्या विकासाकडे लक्ष द्यावे, अशी मागणी केली.