आमगाव : येथील श्री लक्ष्मणराव मानकर इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी येथे डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांच्या जयंतीनिमित्त वाचन प्रेरणा दिवस साजरा करण्यात आला. वाचनाची आवड वाढवण्यासाठी आणि प्रेरणा देण्यासाठी महाविद्यालयातील डी. फार्म आणि बी. फार्म शाखेच्या विद्यार्थ्यांसाठी संदर्भ ग्रंथ आणि स्पर्धा परीक्षांवरील ग्रंथांची प्रदर्शनी आयोजित करण्यात आली होती.
कार्यक्रमात प्राचार्य डॉ. तुलसीदास निंबेकर आणि टेक्निकल ॲडव्हायझर डॉ. डी. के. संघी यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांनी डॉ. कलाम यांच्या जीवनातील प्रेरणादायी पैलूंचा गौरव केला. त्यांनी आत्मविश्वास आणि इच्छाशक्तीने तरुणांना प्रेरित केले. उपस्थित विद्यार्थी वाचनाची आवड निर्माण करण्यासाठी प्रेरित झाले.
कार्यक्रमात महाविद्यालयाचे शिक्षक व विद्यार्थी उपस्थित होते.

