तालुका प्रतिनिधी/ मुकेश शुक्ला
तुमसर: देवसर्रा येथे आज दि.१५ ऑक्टोंबरला सकाळी ११ वा. तुमसर मोहाडी विधानसभा क्षेत्राचे आमदार राजू माणिकराव कारेमोरे यांच्या स्थानिक विकास निधीतून सिमेंट रस्ता बांधकामाचे भूमिपूजन सोहळा पार पडण्यात आले. सदर सिमेंट रस्ता बांधकामासाठी आमदार राजू कारेमोरे यांच्या स्थानिक विकास निधी अंतर्गत १० लाख रुपये मंजूर झाले असून या कामाचे भूमिपूजन पं. स. सदस्य कांचनलाल कटरे यांच्या प्रमुख उपस्थितीत बपेरा जिल्हा परिषद क्षेत्र प्रमुख राजेंद्र बघेले यांच्या हस्ते पार पाडण्यात आले. याप्रसंगी सरपंच ताराबाई साखरे, उपसरपंच जितेंद्र कटरे, ग्रा.पं. सदस्य अनिता कटनकार, महेंद्र बिसने, चॅलेंज बघेले, निखिल कांबळे, पिंटू साखरे सविता भगत, रविकांता बिसने तसेच गावातील मान्यवर मंडळी प्रामुख्याने उपस्थित होते.

