गोंदिया जिल्हा स्तरिय स्पर्धेत 400 मीटर शर्यतीत प्रथम क्रमांक
सालेकसा : बाजीराव तरोने
महाराष्ट्र शासन पुणे अंतर्गत गोंदिया जिल्हा क्रीडा परिषद आणि जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाच्या वतीने मरारटोली, गोंदिया येथे आयोजित शासकीय शालेय जिल्हा स्तरिय मैदानी स्पर्धेत वैष्णवी संतोष गिरेपुंजे हिने 400 मीटर शर्यतीत प्रथम क्रमांक मिळवून उत्कृष्ट कामगिरी केली आहे. या यशाच्या जोरावर तिची विभागीय स्तरीय मैदानी स्पर्धेसाठी चंद्रपूर येथे निवड झाली आहे.
वैष्णवी सध्या अभिनव विद्या मंदिर, रोढा येथे इयत्ता 9 वी मध्ये शिकत आहे. तिच्या यशाबद्दल तिने सर्व शिक्षक आणि पालकांचे आभार मानले आहेत. वैष्णवीची निवड झाल्यामुळे तालुक्यात आनंदाचे आणि उत्साहाचे वातावरण आहे. तिच्या यशामुळे सालेकसा तालुक्यातून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

