बनगांव नळ पाणीपुरवठा योजना चार दिवस बंद

0
265

आमगांव : बनगांव प्राधिकरण नळ पाणीपुरवठा योजनेच्या गुरुत्वनलिकेत बाम्हणी रेल्वे चौकीजवळ गळती आढळली आहे. या गळतीमुळे पाणीपुरवठा सुरळीत ठेवण्यात अडथळा येत असल्याने तातडीने दुरुस्तीची प्रक्रिया हाती घेण्यात आली आहे. दुरुस्तीचे काम पूर्ण होण्यासाठी किमान चार दिवसांचा कालावधी अपेक्षित आहे.

या कालावधीत, सदर पाणीपुरवठा योजना बंद राहणार असून, नागरिकांनी याची नोंद घ्यावी व पाण्याचा वापर काटकसरीने करावा. दुरुस्ती पूर्ण झाल्यानंतर पाणीपुरवठा पुन्हा सुरळीत सुरू केला जाईल, अशी माहिती संबंधित अधिकाऱ्यानी यांनी दिली आहे.

सदर आदेश मा.आर आर सतदेवे उपविभागीय अभियंता ग्रामीण पाणी पुरवठा उपविभाग आमगांव यांच्या सूचनेनुसार देण्यात आला आहे.

 

 

Previous articleवाचन प्रेरणा दिवस साजरा
Next articleबिबट्याच्या हल्ल्यात एक वर्ष बालिका जखमी. आयुध निर्माणी वसाहतीतील घटना.