लखमापूर ची प्रज्वल पोतराजे: एमबीबीएस प्रवेश मिळवणारी पहिली ग्रामीण मुलगी

0
965
1

गावकरी व इतर राज्यांतील नागरीकांनी केला प्रज्वल पोतराजे हिचा सत्कार

चंद्रपूर प्रतिनिधी मनोज गोरे

कोरपना तालुक्यातील लखमापूर गावाच्या प्रज्वल पोतराजे हिने इतिहास रचला आहे. रायपूर इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस, रायपूर या प्रतिष्ठित महाविद्यालयात एमबीबीएस अभ्यासक्रमात तिला प्रवेश मिळाला आहे. प्रज्वलने २०२४ च्या नीट परीक्षेत ५५७ गुण मिळवत हे यश संपादन केले आहे.

एमबीबीएस अभ्यासक्रम हा फक्त वैयक्तिक करिअरसाठीच नव्हे, तर समाजासाठीही अत्यंत महत्वाचा आहे. भविष्यातील आरोग्यसेवा क्षेत्रातील तज्ञ म्हणून प्रज्वलकडून समाजाच्या आरोग्यविषयक गरजा पूर्ण करण्यासाठी मोठी अपेक्षा आहे. वाढत्या आजारांमुळे गुणवत्तापूर्ण डॉक्टरांची मागणी वाढत आहे, आणि प्रज्वलसारख्या मुलींची ग्रामीण भागातून आलेली तज्ञ डॉक्टर होण्याची वाटचाल हा देशाच्या आरोग्यसेवेसाठी महत्वाचा टप्पा आहे.

प्रज्वलचे वडील, गंगाधर पोतराजे यांचे दोन वर्षांपूर्वी कॅन्सरमुळे निधन झाले होते. मात्र, तिच्या आई प्रभा पोतराजे यांनी तिला नेहमीच प्रोत्साहन दिले. तिच्या कुटुंबाने खंबीर पाठिंबा दिला. आजोबा बाबाराव मालेकार, दिलीप मालेकार, मोठे वडील बबन पोतराजे तसेच भावंडे मनोज आणि महेश यांची मदतही प्रज्वलच्या यशात मोलाची ठरली आहे.लखमापूरसह संपूर्ण पोतराजे परिवाराला अभिमान वाटावा असे यश प्रज्वलने मिळवले आहे. तिच्या यशाबद्दल गावभरातून आणि विविध स्तरातून कौतुकाचा वर्षाव होत आहे.एमबीबीएस अभ्यासक्रम हा वैद्यकीय विज्ञानातील सर्वात महत्वाचा अभ्यासक्रम असून, समाजाला उत्तम आरोग्यसेवा पुरवणाऱ्या तज्ञांची निर्मिती करतो. प्रज्वलसारखी विद्यार्थीनी भविष्यात ग्रामीण भागातील आरोग्यसेवा सुधारण्यासाठी महत्त्वाची भूमिका बजावू शकते.