खा. प्रफुल्ल पटेलांच्या प्रयत्नाने नागरी क्षेत्राच्या विकासासाठी 15 कोटींचा निधी मंजूर

0
543

गोंदिया : खासदार प्रफुल्ल पटेल यांच्या पुढाकाराने गोंदिया आणि भंडारा जिल्ह्यातील 11 नागरी क्षेत्रात विकास कामांसाठी एकूण 15 कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. राज्य शासनाच्या नियोजन विभागाने निर्गमित केलेल्या शासन निर्णयानुसार, विकास कामांना प्रशासकीय मान्यता देऊन तत्काळ सुरू करण्याचे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत.

यामध्ये गोंदिया जिल्ह्यातील गोंदिया, गोरेगाव, देवरी, सालेकसा, आमगाव, तिरोडा, अर्जुनी, सडक अर्जुनी या नगरपरिषदांचा समावेश आहे, तसेच भंडारा जिल्ह्यातील भंडारा, तुमसर, पवनी, लाखनी, लाखांदूर आणि साकोली या ठिकाणांसाठीही निधी मंजूर करण्यात आला आहे.

विकासासाठी निधीची मागणी

गोंदिया-भंडारा जिल्ह्याच्या शाश्वत विकासासाठी खा. प्रफुल्ल पटेल सातत्याने प्रयत्नशील आहेत. जिल्ह्यातील नागरिक आणि कार्यकर्त्यांनी विकासकामांसाठी निधीची मागणी केली होती. माजी आमदार राजेंद्र जैन यांनी या संदर्भात खासदार पटेल यांना माहिती दिली होती. यानंतर खा. पटेल यांच्या सूचनेनुसार जिल्हा प्रशासनाने राज्य शासनाकडे विविध विकास कामांचे प्रस्ताव सादर केले.

राज्य शासनाच्या नियोजन विभागाने या प्रस्तावांना मान्यता दिली असून नागरी क्षेत्रातील ठराविक सेवा आणि सुविधांच्या सुधारणा आणि विस्तारासाठी निधी उपलब्ध करून दिला आहे. मंजूर केलेल्या 15 कोटींच्या निधीमुळे गोंदिया आणि भंडारा जिल्ह्यातील नागरी क्षेत्रांच्या विकासाला अधिक गती मिळणार आहे.

नागरी क्षेत्र निहाय निधीचे वाटप

खासदार प्रफुल्ल पटेल यांच्या पुढाकाराने मंजूर झालेल्या निधीचे नागरी क्षेत्रानुसार वाटप पुढीलप्रमाणे आहे:

1. गोंदिया – 27 कामांसाठी 2.50 कोटी रुपये

2. लाखनी – 10 कामांसाठी 1.10 कोटी रुपये

3. पवनी – 12 कामांसाठी 1.60 कोटी रुपये

4. साकोली – 7 कामांसाठी 0.70 कोटी रुपये

5. तुमसर – 15 कामांसाठी 1.35 कोटी रुपये

6. लाखांदूर – 6 कामांसाठी 0.60 कोटी रुपये

7. भंडारा – 12 कामांसाठी 2.15 कोटी रुपये

8. अर्जुनी – 3 कामांसाठी 0.30 कोटी रुपये

9. तिरोडा – 14 कामांसाठी 1.50 कोटी रुपये

10. देवरी – 5 कामांसाठी 0.60 कोटी रुपये

11. सालेकसा – 6 कामांसाठी 0.60 कोटी रुपये

12. गोरेगाव – 8 कामांसाठी 0.80 कोटी रुपये

13. आमगाव – 8 कामांसाठी 0.80 कोटी रुपये

14. सडक अर्जुनी – 4 कामांसाठी 0.40 कोटी रुपये

जनतेचा कृतज्ञता व्यक्त

निधी मंजूर झाल्यामुळे गोंदिया आणि भंडारा जिल्ह्यातील नागरिकांनी खासदार प्रफुल्ल पटेल यांचे आभार मानले आहेत. त्यांच्या नेतृत्वामुळे आणि पुढाकारामुळे या दोन्ही जिल्ह्यांना शाश्वत विकासाच्या दिशेने पुढे नेण्यास मदत होणार आहे. मंजूर निधीच्या वापरामुळे स्थानिक नागरी सेवांमध्ये सुधारणा होईल तसेच शहराच्या विकासाची गती वाढेल.

हा निधी गोंदिया-भंडारा जिल्ह्यातील नागरी क्षेत्रांना आवश्यक असलेल्या विविध सुविधा पुरवण्यासाठी आणि सुधारण्यासाठी वापरला जाणार आहे.