साकरीटोला येथे माजी आमदार राजेंद्र जैन यांचा कार्यकर्त्यांसोबत संवाद, आगामी विधानसभा निवडणुकीसाठी रणनीती आखली

0
263
1

बूथ कमिटी मजबूत करण्यासाठी लटोरी, झालिया आणि सालेकसा येथे बैठका आयोजित करण्याचा निर्णय

साकरीटोला (ता. सालेकसा) : बाजीराव तरोने

आज साकरीटोला येथील श्री प्रभाकर दोनोडे यांच्या निवासस्थानी माजी आमदार श्री राजेंद्र जैन यांनी दोन जिल्हा परिषद क्षेत्रातील प्रमुख पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांसोबत आगामी विधानसभा निवडणुका आणि बूथ संगठनासंदर्भात विविध विषयांवर चर्चा केली. या बैठकीत प्रत्येक बूथवर कमिटी गठण करण्यासह पक्ष संघटन मजबूत करण्यावर विशेष भर देण्यात आला.

यावेळी बूथ कमिटीत महिला आणि युवकांचा समावेश करणे यावर सखोल चर्चा झाली. तसेच, लटोरी, झालिया आणि सालेकसा येथे आगामी काळात बूथ कमिटीच्या बैठका आयोजित करण्याचा निर्णय घेण्यात आला. बैठकीला उपस्थित कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण होते आणि त्यांनी बूथ कमिटी गठनासाठी कटिबद्धतेचा निर्धार व्यक्त केला.

बैठकीत श्री राजेंद्र जैन यांच्यासह प्रभाकर दोनोडे, अजय उमाटे, बिसराम चर्जे, विनोद अग्रवाल, बोलेश्वर नागपुरे, सुनील पटले, सुरेश बंसोड, सुरेश भूते, धर्मेंद्र आँचले, अशोक मडावी, बालकृष्ण हेमने, सूरज शेंडे, कुवरलाल बावनठडे, कमला दोनोडे, अशोक मेंढे, शैलेश फुंडे, राधेश्याम गंगभोज, चंद्रशेखर नंदेश्वर, गगन छाबडा, ओमप्रकाश लांजेवार, नरेश बोहरे, अशोक गिरी, रघुदास नागपुरे, संतोष नागपुरे, हिरामण बडोले, जितेंद्र बडोले, संदीप मिश्रा आणि महेश भूते यांच्यासह मोठ्या संख्येने पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.

बैठकीदरम्यान उपस्थितांनी बूथ स्तरावरील कामकाज अधिक प्रभावी करण्यासाठी संघटन मजबूत करण्याचे महत्त्व अधोरेखित केले.