तुडका येथे इंजि. प्रदिप पडोळे यांच्या अध्यक्षतेखाली भाजप पदाधिकारी व कार्यकर्त्यांची विशेष सभा पार पडली

0
361

जिल्हा प्रतिनिधी/ सतीश पटले 

तुमसर:-भारतीय जनता पार्टीने तुमसर मोहाडी विधानसभेवर आपले अधिपत्य असल्याचा दावा स्पष्ट केला आहे. पक्षाचे कार्यकर्ते, पदाधिकारी, नेते, आघाडी यांची विशेष बैठक विधानसभा प्रमुख इंजि. प्रदीप पडोळे यांच्या अध्यक्षतेखाली तूडका येथील साई सेलिब्रेशन लॉन येथे गुरुवार दिनांक १७ ऑक्टोंबर रोजी पार पडली. त्यात होऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीत आपली भूमिका काय राहील, कार्यकर्त्यांच्या भावना काय, नेतृत्वाची संधी जर हुकल्यास त्याचे प्रभाव व परिणाम येत्या काळात पक्षावर, पक्ष संघटनेवर काय होतील अश्या विविध विषयावर पडोळे यांच्यासह पक्षातील अनेक दिग्गज नेत्यांनी आपले मत मांडले. तुमसर विधानसभा नेहमीच भाजपची राहिली आहे. त्यावर महायुतीचा निर्णय पक्षाचे पदाधिकारी म्हणून सर्व मान्य राहील मात्र त्यात पक्षाच्या कार्यकर्त्यांचा विचार केला जाईल का? महायुतीने ठरवलेल्या उमेदवाराने आपल्या कार्यकाळात भाजपला विश्वासात घेऊन कुठलेही नियोजन केलेले नाही. त्यामुळे त्याचा रोष संपूर्ण विधानसभेत सक्रिय व गठित झालेल्या ३५३ बूथवर प्रत्यक्षात अनुभवास आल्याचे मत त्यावेळी प्रदीप पडोळे यांनी व्यक्त केले. उपस्थित नेत्यांनी तुमसर विधानसभेत भाजपने अनुभवलेल्या संघर्षावर व त्यावर कार्यकर्त्यांनी स्वतः मोर्चे सांभाळून राजकीय चित्र कसे बदलून टाकले यावर देखील लक्ष वेधले. एकसुरात नेतृत्वाची मागणी करताना प्रत्येक कार्यकर्त्यांनी भाजपच्या बाजूने जोरदार घोषणा दिल्या. ही संधी हुकली तर संघटन १० वर्षे मागे जाईल त्यामुळे पक्ष श्रेष्ठींनी याचा विचार करावा म्हणून तुडका येथील पक्षाचे दबाव तंत्र नक्कीच काम करेल याची खात्री त्यावेळी सर्वांनी व्यक्त केली. विधानसभेत भाजप सज्ज झाली आहे. लोकसभेत महायुतीची भूमिका प्रत्येक कार्यकर्त्यांनी बोलून दाखवली. त्यावर आपल्या समारोपीय भाषणातून प्रदीप पडोळे यांनी विद्यमान आमदारांच्या विरुद्ध आपली नाराजी व्यक्त केली. जिथे भाजपच्या कार्यकर्त्यांना न्याय नाही, रोजगाराची संधी नाही, नियोजनात सहभाग नाही, युतीच्या एखाद्या मुद्द्यावर साधी विचारणा नाही तिथे मी सहकार्य करणार नाही अशी स्पष्ट भूमिका पडोळे यांनी त्यावेळी घेतली. अनेकांनी भाजपच्या नावावर सत्ता भोगली मात्र संघटनाच्या नावावर व्यक्तिगत प्रसिद्धी आणि मुजोरीला प्राधान्य देऊन तुमसर विधानसभेत पक्षाला अधोगतीला नेले. यापुढे असे होऊ देणार नाही. आयतखोर नेत्यांसह या पक्षातून त्या पक्षात आपली राजकीय शाख वाचविण्याच्या प्रयत्नात आलेल्या नेत्यांवर देखील पडोळे यांनी निशाणा साधला. त्यावेळी भाजपच्या नेत्यांचा जल्लोष तुमसर विधानसभेचे चित्र बदलून टाकणारे ठरले. या वेळी दिलीप सार्वे, युवराज जमईवार, गीता कोंडेवार, राजेंद्र पटले, निशिकांत ईलमे, काशिराम टेंभरे, प्राची पटले, बंडू बनकर, सुनील लांजेवार, मुन्ना पुंडे, भाऊराव तुमसरे, डॉ अमृत सोनवाने, हरेंद्र राहांगडाले,आशिष कुकडे, गजानन निनावे, मंगेश पारधी, सचिन बोपचे, यादोराव मुंगमोडे, लक्ष्मीकांत सेलोकर, बाबू ठवकर, किशोर राहांगडाले, देवानंद लांजे, रामराव कारेमोरे, प्रकाश धिकोडी, महेश पटले, दिपक घोडीचोर, लक्ष्मीकांत सलामे, राजकुमार मरठे, मतीन शेख, नामदेव चौधरी, आनंद जयस्वाल, देवीसिंग सव्वालाखे, संतोष वहिले व बूथ प्रमुख, शक्तीक्रेन्द्र प्रमुख, सुपर वारीयर्स, प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.भारतीय जनता पार्टीने तुमसर मोहाडी विधानसभेवर आपले अधिपत्य असल्याचा दावा स्पष्ट केला आहे. पक्षाचे कार्यकर्ते, पदाधिकारी, नेते, आघाडी यांची विशेष बैठक विधानसभा प्रमुख इंजि. प्रदीप पडोळे यांच्या अध्यक्षतेखाली तूडका येथील साई सेलिब्रेशन लॉन येथे गुरुवार दिनांक १७ ऑक्टोंबर रोजी पार पडली. त्यात होऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीत आपली भूमिका काय राहील, कार्यकर्त्यांच्या भावना काय, नेतृत्वाची संधी जर हुकल्यास त्याचे प्रभाव व परिणाम येत्या काळात पक्षावर, पक्ष संघटनेवर काय होतील अश्या विविध विषयावर पडोळे यांच्यासह पक्षातील अनेक दिग्गज नेत्यांनी आपले मत मांडले. तुमसर विधानसभा नेहमीच भाजपची राहिली आहे. त्यावर महायुतीचा निर्णय पक्षाचे पदाधिकारी म्हणून सर्व मान्य राहील मात्र त्यात पक्षाच्या कार्यकर्त्यांचा विचार केला जाईल का? महायुतीने ठरवलेल्या उमेदवाराने आपल्या कार्यकाळात भाजपला विश्वासात घेऊन कुठलेही नियोजन केलेले नाही. त्यामुळे त्याचा रोष संपूर्ण विधानसभेत सक्रिय व गठित झालेल्या ३५३ बूथवर प्रत्यक्षात अनुभवास आल्याचे मत त्यावेळी प्रदीप पडोळे यांनी व्यक्त केले. उपस्थित नेत्यांनी तुमसर विधानसभेत भाजपने अनुभवलेल्या संघर्षावर व त्यावर कार्यकर्त्यांनी स्वतः मोर्चे सांभाळून राजकीय चित्र कसे बदलून टाकले यावर देखील लक्ष वेधले. एकसुरात नेतृत्वाची मागणी करताना प्रत्येक कार्यकर्त्यांनी भाजपच्या बाजूने जोरदार घोषणा दिल्या. ही संधी हुकली तर संघटन १० वर्षे मागे जाईल त्यामुळे पक्ष श्रेष्ठींनी याचा विचार करावा म्हणून तुडका येथील पक्षाचे दबाव तंत्र नक्कीच काम करेल याची खात्री त्यावेळी सर्वांनी व्यक्त केली. विधानसभेत भाजप सज्ज झाली आहे. लोकसभेत महायुतीची भूमिका प्रत्येक कार्यकर्त्यांनी बोलून दाखवली. त्यावर आपल्या समारोपीय भाषणातून प्रदीप पडोळे यांनी विद्यमान आमदारांच्या विरुद्ध आपली नाराजी व्यक्त केली. जिथे भाजपच्या कार्यकर्त्यांना न्याय नाही, रोजगाराची संधी नाही, नियोजनात सहभाग नाही, युतीच्या एखाद्या मुद्द्यावर साधी विचारणा नाही तिथे मी सहकार्य करणार नाही अशी स्पष्ट भूमिका पडोळे यांनी त्यावेळी घेतली. अनेकांनी भाजपच्या नावावर सत्ता भोगली मात्र संघटनाच्या नावावर व्यक्तिगत प्रसिद्धी आणि मुजोरीला प्राधान्य देऊन तुमसर विधानसभेत पक्षाला अधोगतीला नेले. यापुढे असे होऊ देणार नाही. आयतखोर नेत्यांसह या पक्षातून त्या पक्षात आपली राजकीय शाख वाचविण्याच्या प्रयत्नात आलेल्या नेत्यांवर देखील पडोळे यांनी निशाणा साधला. त्यावेळी भाजपच्या नेत्यांचा जल्लोष तुमसर विधानसभेचे चित्र बदलून टाकणारे ठरले. या वेळी दिलीप सार्वे, युवराज जमईवार, गीता कोंडेवार, राजेंद्र पटले, निशिकांत ईलमे, काशिराम टेंभरे, प्राची पटले, बंडू बनकर, सुनील लांजेवार, मुन्ना पुंडे, भाऊराव तुमसरे, डॉ अमृत सोनवाने, हरेंद्र राहांगडाले,आशिष कुकडे, गजानन निनावे, मंगेश पारधी, सचिन बोपचे, यादोराव मुंगमोडे, लक्ष्मीकांत सेलोकर, बाबू ठवकर, किशोर राहांगडाले, देवानंद लांजे, रामराव कारेमोरे, प्रकाश धिकोडी, महेश पटले, दिपक घोडीचोर, लक्ष्मीकांत सलामे, राजकुमार मरठे, मतीन शेख, नामदेव चौधरी, आनंद जयस्वाल, देवीसिंग सव्वालाखे, संतोष वहिले व बूथ प्रमुख, शक्तीक्रेन्द्र प्रमुख, सुपर वारीयर्स, प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

 

 

 

 

Previous articleआमगांव विधानसभा में कांग्रेस का परचम लहराने का संकल्प : कार्यकर्ताओं को जुटने का आव्हान
Next articleमाजी सैनिक/पाल्यांना विशेष पुरस्काराने सन्मान