राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे तालुका अध्यक्ष करणार उमेदवारी दाखल…
गोंदिया,दि.19 : आमगाव – देवरी विधानसभा क्षेत्रात विधानसभा निवडणूकीचा चांगलाच रणसंग्रांम बघायला मिळत आहे. पहिले कॉंग्रेस विरुद्ध भाजप असी दुहेरी लढत होणार असल्याची चर्चा होती. पण राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे तालुकाध्यक्ष विलास चाकाटे हे उमेदवारी दाखल करणार असल्याने मित्रपक्षातच खिंडार पडणार असल्याचे बोलले जात आहे. एकीकडे कॉंग्रेस पक्षातील गट बाजी त्यावर मित्र पक्षाची विधानसभेत निवडणुक लढविण्याची तयारीणे कॉंग्रेस पक्षात चांगलीच खडबड उडाली आहे. आता कॉंग्रेस विरुद्ध राष्ट्रवादी असी स्थिति आमगाव – देवरी विधानसभेत रंगायला लागली आहे. ज्याचा चांगलाच फायदा भाजपला होणार असल्याचे चित्र आमगाव – देवरी विधानसभा क्षेत्रात दिसायला लागले आहेत.
कोण आहेत विलास चाकाटे…
विलास चाकाटे हे कमी वयातच समाज चळवळीत काम करणारे, त्यानीं विविध संघटनांचे प्रतिनिधीत्व केले. या अगोदर सक्रिय कार्यकर्ते म्हणून राष्ट्रवादी अजित पवार गटात तालुका प्रवक्ता म्हणून प्रफुल्ल पटेल यांच्या हस्ते निवड करण्यात होती. 2019 विधानसभा निवडणुक, पंचायत समिती/जिल्हा परिषद निवडणुक व नगरपंचायत निवडणुकीत उमेदवारांच्या विजयासाठी मेहनत घेतली. या पक्षाचा प्रभाव महाराष्ट्रात अधिक आहे. महाराष्ट्राच्या राजकारणात उलथापालथ झाल्याने मात्र 2023 मध्ये हा पक्ष फुटला. जुलै 2023 मध्ये शरद पवार यांचे पुतणे अजित पवार यांनी बंडखोरी करत मूळ राष्ट्रवादी पक्ष सोडून आपला एक वेगळा गट तयार केला. महाराष्ट्रात शिवसेनेप्रमाणे राष्ट्रवादीचेही दोन गट झाले. गोंदिया जिल्ह्यांत राष्ट्रवादी शरद पवार पक्ष पुन्हा भरारी घेणार का..❓ याकडे सर्व जिल्हा वासियाचे लक्ष लागले होते. मात्र जिल्ह्यात राष्ट्रवादी पुन्हा उभी करण्यासाठी मिथुन मेश्राम यांच्या नेतृत्वाखाली पक्षाला बळकटी मिळाली. देवरी तालुक्यात राष्ट्रवादी शरद पवार पक्षांची धुरा सांभाळण्यासाठी कुणीही समोर सरसावले नव्हते एक मात्र विलास चाकाटे यांच्या रूपाने राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेश कमिटीचे उपाध्यक्ष यांच्या हस्ते तालुकाध्यक्ष म्हणून विलास चाकाटे यांची निवड करुन नियुक्ती पत्र देण्यात आले. विलास चाकाटे यांनी आपले चक्र फिरवत अजित पवार गटातील जुन्या कार्यकर्त्यांशी संपर्क साधला त्या गटातील एक – एक कार्यकर्ता आपल्या पक्षात कसा येईल याकडे त्यांनी बारकाईने लक्ष देत तालुका पिंजून काढला. सुरवातीला एकही कार्यकर्ता पक्षात यायला तयार नव्हता कालांतराने एक – एक कार्यकर्ते पक्षात यायला सुरुवात केली. या कार्यकर्त्यासह पक्ष संघटनेच्या वाढीसाठी अथक परिश्रम घेऊन अख्खी राष्ट्रवादी उदयास आली. आज गावा गावात राष्ट्रवादी शरद पवार पक्ष पोहोचला आहे. यांचे सर्वकाही श्रेय विलास चाकाटे व संपूर्ण टीमला जात आहे.
विलास चाकाटे यांच्या नेतृत्वात विविध मोर्चे पुरस्कार नाकारणे युवा नेतृत्व
दारिद्र्याने ग्रासलेले, दुष्काळाने त्रासलेले, सरकारी धोरणांनी खंगलेले असंख्य शेतकरी समाज बांधवांसाठी आश्वासनांचे गाजर दाखविणाऱ्या सरकार विरोधात, शेतकऱ्यांच्या प्रश्नांना आंदोलनांच्या माध्यामाने विलास चाकाटे यानीं वाचा फोडली आहे. लोकशाहीची मुळं शेवटच्या घटकांपर्यंत न पोहोचता जेव्हा लोकशाहीच्या नावाखाली सरकार राज्यकर्ते ठोकशाही राबविणाऱ्या सरकार विरोधात संविधान बचाव आंदोलन केले. तळागाळातील जन सामान्यांच्या प्रश्नांसाठी विविध आंदोलने करून सरकार व प्रशासनाने लक्ष वेधन्याचे काम विलास चाकाटे यांनी केले आहे.
सामाजिक चळवळीचा मानस ठेवत राजकारणा सोबत पत्रकारीतेच्या क्षेत्रात विलास चाकाटे यांनी ठसा उमटविला आहे. गोर – गरीब, आदिवासी समाजाचे प्रश्न मांडत प्रशासनाला प्रश्न सोडविण्यासाठी भाग पाडणारे पत्रकार म्हणून सर्वत्र ओळख निर्माण आहे. जेव्हा पर्यंत त्या समस्यांचे निराकरण होत नाही तेव्हा पर्यंत त्या समस्यांचे वाचा फोडण्याचे काम चाकाटे यांनी केले आहे. तालुक्यातील जन सामान्यांच्या प्रश्नांना वाचा फोडणारे पत्रकार म्हणून विलास चाकाटे नावारूपास आहेत. नागपूर येथील सामाजिक संघटने कडून पुरस्कारासाठी चाकाटे यानां आमंत्रण आले होते. मात्र त्यांनी त्यांनी ” पुरस्कार नको जनसामान्यांचे प्रश्न सोडवा” म्हणत तो पुरस्कार नाकारला होता.

