बूथ कमिटीच्या माध्यमातून संघटनात्मक बांधणी करावी – माजी आमदार राजेंद्र जैन

0
86

गोंदिया : ग्राम सतोना ता. गोंदिया येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या बूथ कमिटीची बैठक माजी आमदार श्री. राजेंद्र जैन यांच्या प्रमुख उपस्थितीत व कार्यकर्त्यांच्या मोठ्या उत्साही वातावरणात संपन्न झाली. पक्षाची संघटनात्मक बांधणी मजबूत करण्यासाठी बूथ कमिटी स्थापन करणे आवश्यक असल्याचे माजी आमदार जैन यांनी स्पष्ट केले. त्यामुळे जिल्हा परिषद क्षेत्रातील प्रत्येक बूथवर कमिटी स्थापन करण्याची सूचना त्यांनी कार्यकर्त्यांना दिली.

शेतीसाठी पायाभूत कामे आणि शेतकऱ्यांना दिलासा

या भागातील शेतीच्या सिंचनासाठी खासदार प्रफुल पटेल यांच्या प्रयत्नांमुळे रजेगाव-काटी उपसा सिंचन योजना, डांगोरर्ली उपसा सिंचन, उच्च पातळी बंधाऱ्याचे काम करण्यात आले आहे. पुरामुळे आणि धान पिकांवर आलेल्या रोगराईमुळे शेतकऱ्यांना झालेल्या नुकसानीच्या पार्श्वभूमीवर, यावर्षी हेक्टरी २५ हजार रुपये मिळवून देण्याचे आश्वासन माजी आमदार जैन यांनी दिले.

विकासाच्या दिशेने महत्त्वपूर्ण पावले

तसेच, या भागाच्या विकासासाठी पायाभूत कामे आणि कोरणी घाट तीर्थक्षेत्राच्या विकासासाठी निधी मंजूर करून देण्यात आला आहे. महायुती सरकारकडून शेतकऱ्यांच्या कृषी पंपांना मोफत वीज देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. लाडली बहीण योजनेच्या माध्यमातून महिलांचे सक्षमीकरण आणि सामाजिक-सामर्थ्यवर्धनासाठी प्रयत्न केले जात आहेत. सरकार सर्व स्तरांवर सामाजिक परिवर्तन घडवून आणण्याच्या दिशेने कार्यरत आहे.

येत्या निवडणुकीत निर्णयाला पाठिंबा देण्याचे आवाहन

माजी आमदार जैन यांनी येत्या निवडणुकीत खासदार प्रफुल पटेल यांच्या निर्णयाला पाठिंबा देण्याची वेळ आल्याचे सांगून, या भागाच्या विकासासाठी त्यांना योग्य समर्थन मिळावे, असे आवाहन केले.

बैठकीला माजी आमदार राजेंद्र जैन यांच्यासह कुंदनभाऊ कटारे, गणेश बरडे, रविकुमार पटले, नेहा तुरकर, केतन तुरकर, रामलाल उईके, डॉ. श्यामभाऊ तुरकर, शिवलाल जामरे, राजेश जमरे, ओमप्रकाश ठाकरे, नाजीम शेख, रणजित रामटेके, रेखलाल राऊत, बबिता पाचे, बलूराम पाचे, ममता गायकवाड, शहावंती कावरे, दयावती शहारे, गंगाराम मानकर, प्रवेश अवस्थी, दुर्गाप्रसाद तुरकर, संभु असाटी, मदन बीसेन, तेजराम सहारे, सुनील पटले, ईश्वर मानकर, शैलेश वासनिक, छोटेलाल जामरे, सुरेश तुरकर, रौनक ठाकूर यांसह इतर पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.