आमगाव– स्थानिक भवभूती शिक्षण संस्था द्वारा संचालित श्री लक्ष्मणराव मानकर इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी आमगाव, येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रज्ञान विद्यापीठ लोणेरे च्या अनुषंगाने महाविद्यालय स्तरीय अविष्कार स्पर्धा पार पडली.
महाराष्ट्राचे राज्यपाल व सर्व विद्यापीठे यांचा अविष्कार सुरू करण्याचा उद्देश महाविद्यालयातील तरुणांना व्यासपीठ उपलब्ध करून संशोधनाची रुची निर्माण करून घेण्यासाठी मदतीचे हात पुढे करणे व वैज्ञानिक ज्ञान प्राप्त करणे असा आहे.
नवनवीन शोध घेणे व निष्कर्ष काढून त्यात आजच्या जगाची गरज लक्षात घेऊन विद्यार्थ्यांनी संशोधन करावे व महाराष्ट्र शासन च्या कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी जास्तीत जास्त संख्येने सहभाग घ्यावा असे मत महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. तुलसीदास निंबेकर यांनी व्यक्त केले.
सदर स्पर्धेत बी. फार्मसी च्या १५ विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला यामध्ये विविध क्षेत्रातील आपले रिसर्च विद्यार्थ्यांनी पोस्टर व मॉडेलच्या स्वरूपात सादर केले.
सूत्रसंचालन प्रा. रोशनी अग्रवाल यांनी केले तसेच कार्यक्रम यशस्वीपणे पार पाडण्यासाठी प्रा. देवेंद्र बोरकर, प्रा जितेंद्र शिवणकर, प्रा अनिल सोरी, प्रा चेतन बोरकर, मनीषा बिसेन, राणी भगत यांचे सहकार्य लाभले. संस्थेचे अध्यक्ष श्री केशवभाऊ मानकर तसेच टेक्न. ॲडव्हायझर डॉ. डी.के. संघी यांनी सदर कार्यक्रमाबद्दल विद्यार्थ्यांचे कौतुक केले.
लक्ष्मणराव मानकर फार्मसी कॉलेजमध्ये अविष्कार स्पर्धा
1